Join us  

Republic Day 2022 : बिग बी ते कंगना रणौत! बॉलिवूड स्टार्सने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 10:38 AM

Republic day 2022:यामध्येच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही देशवासीयांना आणि चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Republic Day 2022 : संपूर्ण देशात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकामध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. तर, अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्येच बॉलिवूडसेलिब्रिटींनीही देशवासीयांना आणि चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात अमिताभ बच्चनपासून तापसी पन्नूपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारे बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी असून या गर्दीतील एका व्यक्तीच्या हातात भारताचा झेंडा आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी 'सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा', असं म्हटलं आहे. असाच आणखी एक फोटो त्यांनी ट्विटरवरही शेअर केला आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येणाऱ्या कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'आपले पहिले राष्ट्रगीत… सर्वांना  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 'असं कॅप्शन दिलं आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री सारा अली खानने देखील सुंदर ड्रेस परिधान करुन हातात झेंडा घेऊन एक फोटो पोस्ट केला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानी यानेदेखील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत त्याने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!' असं म्हटलं आहे. 

टॅग्स :प्रजासत्ताक दिनबॉलिवूडटेलिव्हिजनसेलिब्रिटी