Join us

रेखा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या रायला लिहिले ओपन लेटर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 17:29 IST

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला एक ओपन लेटर लिहिले. आपल्या ओपन ...

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला एक ओपन लेटर लिहिले. आपल्या ओपन लेटरमध्ये रेखा यांनी लिहिले की, ‘माय ऐश तुझ्यासारखी महिला कधीच थांबू शकत नाही.’ रेखा आणि ऐश्वर्यामध्ये खूपच बळकट असे नाते आहे. दोघींमध्येही खूप चांगली अंडरस्टॅडिंग आणि फ्रेंडशिप आहे. बºयाचदा या दोघी सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकींवर स्तुतिसुमने उधळताना दिसून आल्या. रेखा नेहमीच ऐश्वर्याचे काम आणि तिच्या हटके स्टाइलचे कौतुक करीत असतात. याव्यतिरिक्त रेखा यांनी ऐशला एक ओपन लेटर लिहिले असून, ज्यामध्ये त्यांनी ऐशवरील प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. रेखा यांनी लिहिले की, ‘माय ऐश, तुझ्यासारख्या महिलेला कोणीही रोखू शकत नाही. ती एक वाहती नदी आहे, जिला कोणीही थांबवू शकत नाही. ती त्याच ठिकाणी थांबते ज्याठिकाणी तिला थांबायचे असते. ती फक्त स्वत:ला त्यासाठी तयार करीत असते.’ पुढे रेखा यांनी लिहिले की, ‘लोक कदाचित हे विसरले असतील की, ऐश्वर्याने काय म्हटले होते? मात्र ते हे कधीच विसरणार नाहीत की, ऐशने त्यांना कशी अनुभूती दिली. ती एक प्रेरणा आहे, एनर्जी आहे, डी स्ट्रेंथ आहे. तिने काही करण्याअगोदरच हे कळून चुकते की, तिच्यात काय खुबी आहे. रेखा यांच्या मते, ऐश ही स्वत:मध्येच खूप बळकट महिला आहे. तिला काही सिद्ध करण्याची अजिबातच आवश्यकता नाही. रेखा ऐशला ‘बेबी’ म्हणून संबोधतात. त्यांच्या मते, ऐशने खूप मोठा पल्ला गाठला आहे. त्यामुळे ऐशचे कौतुक करताना माझी लेखणी थांबण्यास तयार नाही. ऐशची सुंदर मुलगी जिचा चेहरा चंद्रासमान आहे, तिच्यावर मला गर्व वाटतो. ऐश मुलगी आराध्यासाठी खूप चांगली ‘अम्मा’ आहे. दरम्यान, रेखा यांच्या या कौतुकप्रधान पत्रानंतर ऐश त्यावर काय उत्तर देणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.