Join us  

'सेटवर सगळे हसत होते अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्याने रेखाला केलं होतं बळजबरीने किस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 1:02 PM

Rekha: रेखा सेटवर रडत होत्या पण कोणीही त्या अभिनेत्याला थांबवायचा प्रयत्न केला नाही.

भरजरी बनारसी साडी, केसात गजरा असा लक्ष करत अभिनेत्री रेखा (rekha) कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून आजही रेखाकडे पाहिलं जातं.८०-९० चा काळ गाजवणाऱ्या रेखाचे आजही असंख्य चाहते आहेत. अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या रेखाचं प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्य जास्त चर्चेत राहिलं. यात सध्या तिच्या एका सिनेमाचा किस्सा चर्चिला जात आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याने सिनेमाच्या सेटवर तिला बळजबरीने किस केलं होतं.रेखाने तिच्या आयुष्यातील अनेक किस्से, प्रसंग तिच्या 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात सांगितले आहेत. यात वयाच्या १५ व्या वर्षी एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिला किस केलं होतं. विशेष म्हणजे हा अॅक्टर तिच्यापेक्षा २५ वर्षाने मोठा होता.

रेखाने १९६९ मध्ये अंजान या बंगाली सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता बिस्वजीत चटर्जी यांनी स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमात बिस्वजीत आणि रेखा यांचा एक रोमॅण्टिक सीन होता. हा सीन केल्यानंतर त्याची खूपच चर्चा झाली होती. परंतु, हा सीन करणं रेखा यांच्यासाठी फार कठीण गेला होता. या सीननंतर त्या रडायला लागल्या होत्या.

नेमकं काय घडलं होतं सेटवर? 

'अंजाना' या सिनेमात रेखा आणि बिस्वजीत यांचा एक रोमॅण्टिक सीन होता. या सीनमध्ये बिस्वजीत यांना रेखाला किस करायचं होतं. त्या काळात बॉलिवूडमध्ये किसिंग सीन वाईट मानला जायचा. त्यामुळे कोणतीही अभिनेत्री हे सीन करायला पटकन तयार व्हायची नाही. परंतु, या सिनेमामध्ये रेखाला कोणतीही पूर्वकल्पना न देता तो सीन शूट करण्यात आला. ज्यामुळे त्या रडू लागल्या होत्या.

अभिनेत्याने जबरदस्ती केलं रेखाला किस

"या बंगाली सिनेमात एक रोमॅण्टिक सीन होता. पण, हा सीन शूट करण्यापूर्वी मला कोणतंही ब्रीफिंग दिलेलं नव्हतं. त्यामुळे सीन सुरु झाल्यावर बिस्वजीत चटर्जी मला जबरदस्तीने किस करु लागले. पहिल्यांदा तर मला धक्काच बसला आणि त्यानंतर मी रडायलाच लागले", असं रेखा यांनी म्हटलं आहे. 

पुढे त्या म्हणतात, "बिस्वजीत किस करत असताना कोणीही त्यांना थांबवायचा प्रयत्न केला नाही. उलट सेटवरचे सगळेच जण शिट्ट्या वाजवत होते, टाळ्या वाजवत होते. मात्र, हा सीन सिनेमातून हटवण्याचीमागणी सेन्सॉर बोर्डाने केली होती. ज्यामुळे हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला होता." 

टॅग्स :बॉलिवूडरेखासिनेमासेलिब्रिटी