Join us  

Rekha Birthday Special: अमिताभ यांची भेट होऊ न शकल्यावर रेखा म्हणाल्या होत्या, मला मृत्यू मंजूर होता, पण...

By अमित इंगोले | Published: October 10, 2020 12:51 PM

रेखा या अमिताभ बच्चन यांना भेटू शकल्या नाही त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, 'मला मृत्यू मंजूर होता, पण असं लाचार जगणं मंजूर नाही'.

६५ वर्षांची झाली असतानाही रेखाबाबत लोकांमधील क्रेझ जराही कमी झालेली नाही. आजही त्यांच्या सौंदर्याने फॅन्स घायाळ होतात. त्यांचे सिनेमे तर गाजलेच पण त्यांची पर्सनल लाइफही नेहमी चर्चेत राहिली. ज्याही मैफलीत त्या दिसतात तिथे रौनक बघायला मिळेत. जेव्हाही त्यांचं नाव घेतलं जातं आपोआप त्यांच्या नावासोबत अमिताभ बच्चन यांचं नाव जोडलं जातं. दोघांनीही कधी एकमेकांवरील प्रेम खुलेपणाने मान्य केलं नाही, पण त्यांची चर्चा तेव्हापासून आजही सुरूच आहे. आज आम्ही रेखा यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्ताने रेखा यांची एक खास बाब तुम्हाला सांगणार आहोत. रेखा या अमिताभ बच्चन यांना भेटू शकल्या नाही त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, 'मला मृत्यू मंजूर होता, पण असं लाचार जगणं मंजूर नाही'.

१९८३ मध्ये 'कुली' सिनेमाचं शूटींग करताना झालेल्या अपघातानंतर अमिताभ मृत्यू आणि जगण्याची लढाई लढत होते. असे सांगितले जाते की, त्यावेळी रेखा आणि अमिताभ एकमेकांपासून वेगळे झाले होते. अमिताभ यांच्यासोबत झालेल्या अपघातानंतर रेखा या स्वत:ला रोखू शकल्या नाही आणि त्या अमिताभ बच्चन यांची एक झलक बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हा अशा बातम्या समोर आल्या होत्या की, त्यावेळी रेखा यांना अमिताभ यांना भेटू दिलं गेलं नाही. रेखा यांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला होता.

एबीपी न्यूजने एका मॅगझीनच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रेखा म्हणाल्या होत्या की, 'विचार करा की त्यावेळी मी त्या व्यक्तीला हे सांगू शकले नाही की, मला कसं वाटतंय. मी हे जाणून घेऊ शकलो नाही की, त्या व्यक्तीला कसं वाटतंय. मला मृत्यू मंजूर होता, पण ही लाचारी मंजूर नव्हती. मृत्यूही इतका वेदनादायी होत नसेल'. या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की, रेखा यांच्या मनातून अमिताभ यांच्याबद्दलचं प्रेम कमी झालेलं नव्हतं. पण दुसरीकडे अमिताभ यांनी असं काही नसल्याचं सांगितलं. त्यांच्यानुसार, रेखा केवळ त्यांची एक को-स्टार होती, त्यापेक्षा जास्त काही नाही.

दरम्यान रेखा यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ ला चेन्नईमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव भानुरेखा आहे. त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या वडिलांचं आणि आईचं लग्न झालेलं नव्हतं. रेखा यांचे वडील तमिळ सिनेमाचे सुपरस्टार जॅमिनी गणेशन आणि आई अभिनेत्री पुष्पावली. त्यांच्या वडिलांनी त्यांना आधी स्वीकारलं नव्हतं. तेव्हा १३ वयाच्या असताना रेखा यांना घर चालवण्यासाठी सिनेमात काम सुरू करावं लागलं.

रेखा या १९६९ मध्ये आईसोबत हिंदी सिनेमात काम करण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या. रेखा यांचा पहिला सिनेमा अंजाना सफर होता. ज्यात त्यांचे हिरो विश्वजीत होते. पण हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांचा पहिला रिलीज झालेला हिंदी सिनेमा सावन भादो हा होता. आपल्या ४५ वर्षांच्या करिअरमध्ये रेखा यांनी १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे.  

टॅग्स :रेखाबॉलिवूडअमिताभ बच्चन