‘मान्यता’ बनली ‘भाई-बाबा’ची शांतीदूत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 11:33 IST
बॉलीवूडचा संजूबाबा आणि सुपरस्टार सलमान भाई यांच्यात अनेक वर्षांपासून वैमनस्य आले आहे. ‘चल मेरे भाई’ कोस्टार सलमान-संजय दत्त हे ...
‘मान्यता’ बनली ‘भाई-बाबा’ची शांतीदूत ?
बॉलीवूडचा संजूबाबा आणि सुपरस्टार सलमान भाई यांच्यात अनेक वर्षांपासून वैमनस्य आले आहे. ‘चल मेरे भाई’ कोस्टार सलमान-संजय दत्त हे आता मित्र नाहीत. कधीकाळी एकमेकांच्या भावाची भूमिका केलेल्या भाई आणि बाबा यांना आता एकमेकांचे केवळ मित्र व्हायलाही लाज वाटते आहे.एवढे त्यांच्यात काय झाले? वेल, ते तर आता त्या दोघांनाच माहित. पण, एवढे चांगले दोन मोठे कलाकार आता एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. त्यांच्यात सामंजस्य आणण्यासाठी आता संजय दत्तची पत्नी मान्यता शांतीदूत म्हणून काम करत आहे.संजूबाबाच्या काही मित्रांना सोबत घेऊन ती आता त्यांच्यात पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करते आहे. वेल, ही तर चांगलीच बाब आहे. याचा अर्थ आपल्याला लवकरच ते दोघे हातात हात घेऊन मस्त गप्पा मारतांना दिसतील यात काही शंकाच नाही!