Join us

सलमान खानमुळेचं प्रियांका चोप्राने सोडला ‘भारत’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 21:10 IST

प्रियांका चोप्राने ‘भारत’ का सोडला, याची वेगवेगळी कारणे आपण वाचलीत़ नुकताच सलमान खानही यावर बोलला.

प्रियांका चोप्राने ‘भारत’ का सोडला, याची वेगवेगळी कारणे आपण वाचलीत़ नुकताच सलमान खानही यावर बोलला. माझ्यासोबत काम करायचे म्हणून प्रियांकाने माझी बहीण अर्पिला हजारदा फोन केला होता. मला सलमानसोबत काम करायचेयं, असे अर्पिताला ती अनेकदा म्हणाली होती. तिने अली अब्बासलाही फोन केला होता. माझ्यासाठी रोल असेल तर बघ, असे ती म्हणाली होती. मग अचानक तिने ‘भारत’ का सोडला, मला ठाऊक नाही़ याची दोनचं कारणे असू शकतात. एक तर तिला माझ्यासोबत काम करायचे नसेल किंवा कदाचित बॉलिवूडमध्ये ती इंटरेस्टेड नसेल. तिला हॉलिवूडमध्येचं काम करायचे असेल, असे सलमान म्हणाला होता. सलमानच्या एका जवळच्या मित्राचे खरे मानाल तर सलमान म्हणतोय, ते खरे आहे. प्रियांकाने केवळ अर्पिता व अली अब्बासलाचं फोन केला नव्हता तर ‘भारत’मधील रोल मिळावा म्हणून प्रियांका स्वत: सलमानला भेटायला दुबईला गेली होती. अर्थात सलमानने याचा कुठेही उल्लेख केला नाही.आता प्रियांकाच्या एका जवळच्या व्यक्तिनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रियांकाला ‘भारत’मध्ये काम करायचे होते. यासाठी तिने बरेच प्रयत्नही केलेत. पण या चित्रपटात तिच्याशिवाय दिशा पाटनी आणि तब्बूही आहेत, हे कळल्यावर प्रियांकाचा या चित्रपटातील इंटरेस्ट कमी झाला. याशिवाय आणखी एक गोष्ट ऐकून तिला धक्का बसला. होय, सलमान सेटवर उशीरा पोहोचतो आणि लंच टाईमनंतरच शूटला सुरूवात करतो, हे प्रियांकाला कळले. अभिनेत्रींचे सीन्स त्याच्या अनुपस्थितीत शूट केले जातात, हे ऐकून तर प्रियांका सून्न झाली. कारण कामाची ही पद्धत प्रियांकाच्या स्वभावाच्या विरूद्ध होती. प्रियांकाला या दोन्ही गोष्टी मंजूर नव्हत्या. करिअरच्या या टप्प्यावर बॉलिवूडच्या ए- लिस्ट सुपरस्टार काम करण्याच्या तुलनेत आव्हानात्मक भूमिका करण्यास प्रियांकाचे प्रथम प्राधान्य आहे. या सगळ्या कारणांमुळे तिने ‘भारत’ सोडण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :प्रियंका चोप्रासलमान खानभारत सिनेमा