‘दबंग3’ची तयारी सुरू! सलमान खानने केले कन्फर्म!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 05:00 PM2018-09-11T17:00:03+5:302018-09-11T17:00:40+5:30

होय, सलमानच्या ‘दबंग3’ची घोषणा झालीय. आज ‘दबंग’ला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग3’ची घोषणा केली.

salman khan and sonakshi sinha announce third installment of dabangg | ‘दबंग3’ची तयारी सुरू! सलमान खानने केले कन्फर्म!!

‘दबंग3’ची तयारी सुरू! सलमान खानने केले कन्फर्म!!

सलमान खानच्या ‘रेस3’या चित्रपटाने सिनेप्रेमींची भलतीच निराशा केली होती. (पण तरिही हा चित्रपट हिटच्या यादीत जावून बसला, हा भाग अलहिदा) ‘रेस3’नंतर सलमान खान ‘दबंग3’वर काम सुरू करणार, अशी बातमी असताना सोशल मीडियावर मात्र भलतीच मोहिम उघडली होती. होय, ‘दबंग3’बनू नये, अशी मागणी अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे रेटली होती. केवळ मागणीचं नाही तर या मागणीने मोहिमेचे रूप घेतले होते. परिणामी #WeDon’tWantDabangg3  सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला होता. ‘दबंग 3’ का बनू नये, यामागची कारणेही लोकांनी स्पष्ट केली होती. चुलबूल पांडे हिंदी सिनेमाचे आयकॉनिक पात्र आहे. सुमार कास्ट, सुमार दिग्दर्शन आणि सुमार कथेसह आम्ही या आयकॉनिक पात्राचे धिंडवडे निघताना बघू शकत नाही, असे या लोकांचे म्हणणे होते. पण सलमानने या मोहिमेकडे जराही लक्ष दिले नाही. होय, कारण सलमानच्या ‘दबंग3’ची घोषणा झालीय. आज ‘दबंग’ला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग3’ची घोषणा केली. पुढील वर्षी ‘दबंग3’ येणार, असे खुद्द सलमानने सोशल मीडियावर जाहीर केले. केवळ सलमानचं नाही तर ‘दबंग’ सीरिजमध्ये रज्जोचे आयकॉनिक पात्र साकारणाऱ्या सोनाक्षी सिन्हानेही एक फोटो शेअर करत ही बातमी कन्फर्म केली. ‘Hud hud Dabangg dabangg dabangg dabangg! 8 years on, still going strong’, असे तिने लिहिले.
‘दबंग’ या चित्रपटासह सोनाक्षीनेही बॉलिवूडमध्ये ८ वर्षे पूर्ण केली आहेत. कारण ‘दबंग’ हा सोनाक्षीचा पहिला डेब्यू सिनेमा होता. २०१० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग2’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. तूर्तास सलमान ‘भारत’ आणि ‘दबंग3’ एकत्र शूट करतोय. याशिवाय ‘बिग बॉस12’ही तो होस्ट करतोय.

Web Title: salman khan and sonakshi sinha announce third installment of dabangg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.