या कारणामुळे तब्बू नेहमीच तयार असणार अजय देवगणसोबत काम करण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 12:05 IST
तब्बू आणि अजय देवगणच्या मैत्रीबाबत सगळीकडे माहिती आहे. फक्त पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिण आहेत. ...
या कारणामुळे तब्बू नेहमीच तयार असणार अजय देवगणसोबत काम करण्यासाठी
तब्बू आणि अजय देवगणच्या मैत्रीबाबत सगळीकडे माहिती आहे. फक्त पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिण आहेत. तब्बूने आणि अजयने तक्षक, हकीकत, विजयपथ आणि दृश्यमसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. उद्या रिलीज होणाऱ्या गोलमाल अगेनमध्ये दोघे एकत्र दिसणार आहेत. मात्र तब्बू आता म्हटले आहे की ती अजय देवगणसोबत पुन्हा चित्रपटाता काम करण्यासाठी कधीच नाही म्हणणार नाही. कारण अजय देवगणसोबत तिचे ट्युनिंग चांगले जमते. तब्बू पुढे म्हणाली, 'अजय आणि मी लहानपणापासून चांगले मित्र आहोत त्याच्यासोबत काम करणे नेहमीच फायद्याचे असते. मी त्याच्यासोबत कोणत्याही चित्रपटात काम करण्यासाठी नाही बोलणार नाही. जर तो कधी एखाद्या चित्रपटाचा दिग्दर्शक किंवा निर्माता असले आणि त्यांने मला एखादी भूमिका ऑफर केली तर ती मी नक्कीच करेन. ''तब्बूने गोलमाल अगेनची स्क्रिप्ट न वाचताच चित्रपटासाठी होकार दिला होता असा तिने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगला सांगितले होते. तब्बू म्हणाली होती की, मी गोलामाल सीरिजचा भाग बनण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे जेव्हा ही संधी तिला मिळाली तेव्हा तिने लगेच होकार दिला. हा चित्रपट तब्बूसाठी खास असल्याचे तिचे म्हणणे आहे. जेव्हा ही ती गोलमाल सीरिजचा कोणताही चित्रपट बघते तेव्हा ती हसू अनवार होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे याआधी जेव्हा जेव्हा ती रोहित शेट्टीला भेटायची मला गोलमाल सीरिजचा भाग बनायची इच्छा असल्याचे सांगायची. मी या चित्रपटात कॅमिओ करायलादेखील तयार असल्याचे तिचे म्हणणे असायचे. गोलमालच्या सेटवर पिकनिक सारखे वातवरण असायचे असे तब्बूने सांगितले आहे. ALSO READ : 'त्या' रात्री जॅकी श्रॉफने केला होता तब्बूवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ?रोहित शेट्टी दिग्दर्शित हा गोलमाल सीरिजचा चौथा भाग आहे. यात तब्बू आणि परिणीती चोप्रा पहिल्यांदाच दिसणार आहेत. गोलमालच्या आतपर्यंतचे तीन ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट गेले आहेत. त्यामुळे रोहित शेट्टी आणि चित्रपटाच्या टीमला याही चित्रपटाकडून तेवढ्याच अपेक्षा आहेत.