Join us

ह्या कारणामुळे सारा अली खान झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 16:39 IST

रोहित शेट्टी व रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'सिम्बा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे 'सिम्बा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सिम्बा' चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले

रोहित शेट्टीरणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'सिम्बा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंग व सारा अली खान पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले अाहे. यामुळे अभिनेत्री सारा अली खान खूप भावूक झाली आणि तिने सेटवर फोटो शेअर करून स्पेशल पोस्ट लिहिली आहे. 

साराने रणवीर व रोहित शेट्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की, 'आणि आता चित्रीकरण संपले. रोहित शेट्टी सर तुमचे धैर्य, सल्ला, दिशा, चिंता, दयाळूपणा, काळजी आणि सगळ्याच बाबींसाठी मनापासून आभार मानते. रणवीर सिंग तू खरेच खरा स्टार आहेस. तुझा उत्साह आणि सकारात्मकता ही अतुलनीय बाब आहे. कामात झोकून देणे नक्की काय असते हे तुमच्याकडे पाहून मला कळले. यातूनच तुम्ही दोघे नक्की तुम्ही दोघे म्हणून का ओळखले जाता हे मला कळले. ही जागा नक्की तुम्ही कशी मिळवली हे मला जाणवले. '

फक्त साराच नाही तर रोहित शेट्टीही भावूक झाला. पाच महिन्यापूर्वी जून २०१८ मध्ये 'सिम्बा'चा प्रवास सुरु केला होता आणि आता हा प्रवास संपला आहे. माझ्या मनात अनेक मिश्र भावना आहेत. सिम्बा म्हणजेच संग्राम भालेराव. माझा रणवीरबरोबर हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्याच्याबरोबर काम करणे खूपच मनोरंजक होते अशी पोस्ट रोहितने लिहिली आहे. इतकेच नाहीतर एका चांगल्या आणि उत्कृष्ट अभिनेत्याबरोबर काम करायला मिळाले जो आपल्या कामाप्रती इतका इमानदार आणि खरा आहे. मी आणि माझी पूर्ण टीम शपथेवर सांगू शकतो की, रणवीर सिंगपेक्षा सिम्बा कोणीही चांगले साकारू शकत नाही, असेही रोहितने म्हटले आहे.

सारा अली खानचे यावर्षी दोन चित्रपट येणार असून ती 'केदारनाथ'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर करण जोहर आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' हा चित्रपटही तिच्यासाठी खास आहे. 

टॅग्स :सारा अली खानसिम्बारणवीर सिंगरोहित शेट्टी