होय, एका मुलाखतीत रविनाने सांगितले होते की, ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ या गाण्याची शूटिंग करताना मी अचानकच बेशुद्ध होऊन खाली पडली होती. वास्तविक रविना त्याकाळी अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. रविनाने कुठल्याही गॉड फादरविना इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. अर्थातच याकरिता तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. रविनाने सांगितले की, ‘जेव्हा मला या गाण्याची शूटिंग करण्यासाठी बोलाविण्यात आले, तेव्हा मी शिमला येथे कुठल्यातरी चित्रपटाची शूटिंग करण्यात व्यस्त होती.
पुढे बोलताना रविनाने म्हटले की, मी फ्लाइटने तातडीने शिमला येथून मुंबईला पोहोचली. थंड वातावरणातून एकदमच मुंबईची गर्मीचा सामना करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. त्यामुळे याचा माझ्या प्रकृतीवर परिणाम होणे स्वाभाविक होते. अशातही मी सेटवर स्वत:ला तयार केले. मात्र जे व्हायचे तेच झाले. जेव्हा मी डान्स करीत होती, तेव्हा अचानकच बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यामुळे सेटवर एकच गोंधळ झाला. मला अचानक मेडिकल व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. मी शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा शूटिंग केली.