Join us

​ रवीना टंडन म्हणते, ट्विंकल माझी चांगली मैत्रिण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 16:13 IST

ट्विंकल खन्ना व रवीना टंडन दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत, हे ऐकून खरे वाटेल? पण आता आपल्या वाटण्या न वाटण्याचा प्रश्नच ...

ट्विंकल खन्ना व रवीना टंडन दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत, हे ऐकून खरे वाटेल? पण आता आपल्या वाटण्या न वाटण्याचा प्रश्नच नाही. कारण रवीना टंडनने स्वत: हे म्हटले आहे. अलीकडे एका मुलाखतीदरम्यान कुणीतरी तिला ट्विंकलबद्दल छेडले. अरूणाचलम मुरूगनाथम यांना रवीनात ट्विंकलची झलक दिसते. खुद्द ट्विंकलने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. मी पहिल्यांदा अरूणाचलम यांना भेटले तेव्हा तू तर अगदी रवीनासारखी दिसतेस, असे ते मला म्हणाले होते, असे ट्विंकलने सांगितले होते. याच संदर्भातने रवीनाला प्रश्न विचारण्यात आला. रवीना यावर काय बोलेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच, तिने यावर अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली. खरंच असे झाले. अरूणाचलम यांनी ट्विंकलला रवीना समजले? अरूणाचलम यांना खरेच असे वाटत असेल तर आश्चर्याची बाब आहे. पण ट्विंकल व मी चांगल्या मैत्रिणी आहोत. आम्ही अनेकदा भेटलो आहोत, असे रवीना म्हणाली. मग काय? रवीनाने ट्विंकलला तिची मैत्रिण सांगावे, याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटले. याचे कारण भूतकाळ. ट्विंकलचा पती अक्षय कुमार व रवीना यांचे एकेकाळी अफेअर होते, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. रवीना सध्या ‘मातृ: दी मदर’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय.अरूणाचल यांच्या आयुष्यावर आधारित ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारतो आहे.  ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत यावर आधारित आहे.