Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदासोबत हिट ठरल्या रविना, माधुरी दिक्षित, राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:39 IST

बॉलिवूडचा तगडा अभिनेता गोविंदा याचा आज वाढदिवस आहे. या कलाकाराने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच ...

बॉलिवूडचा तगडा अभिनेता गोविंदा याचा आज वाढदिवस आहे. या कलाकाराने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच आपल्या विनोदी शैलीतदेखील त्याने प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. त्याचा अभिनय आणि चित्रपट आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अशा या कलाकारासोबत बॉलीवूडच्या कित्येक अभिनेत्री चित्रपटात हीट झाल्या आहेत. अशा या हीट अभिनेत्रींचा घेतलेला हा आढावा.गोविंदा - करिश्मा कपूर - बॉलिवूडमध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. त्यामुळे ही जोडी बॉलिवूडमध्ये हीट ठरली आहे. या जोडीने कित्येक चित्रपट हीट केले आहेत. शिकारी, हसीना मान जायेंगी, हिरो नं. १, साजन चले ससुराल, कुली नं. १, अंदाज अपना अपना, दुलारा असे अनेक चित्रपट या जोडीने बॉलीवूडला दिले आहेत. गोविंदा - रविना टंडन - बॉलिवूडमध्ये गोविंदाने रविना टंडनसोबतदेखील नव्वदीचा काळ गाजविला होता. या जोडीची गाणीदेखील तितकीच हीट ठरली असल्याचे पाहायला मिळाले. या जोडीने अंदाज अपना अपना, राजाजी, आँखियों से गोली मारे, अनारी नं. वन,दुल्हेराजा, दिवाना मस्ताना, आण्टी नं. वन असे अनेक चित्रपटांनी या जोडीने बॉलिवूड गाजविले आहे.गोविंदा - माधुरी दिक्षित - या अभिनेत्रीने गोविंदासोबत अनेक चित्रपट केले आहेत. यामध्ये बडें मिया छोटे मिया, इज्जतदार, महासंग्राम, पाप का अंत या चित्रपटांचा समावेश आहे. अभिनेत्री माधुरी दिक्षितने तर बॉलिवुडवर राज्य केले असे म्हणण्यास अर्थ नाही. आज ही अभिनेत्री प्रेक्षकांचे मन जिंकत असल्याचे दिसत आहे. गोविंदा - राणी मुखर्जी - बॉलिवूडची तगडी अभिनेत्री राणी मुखर्जीदेखील गोविंदासोबत हीट ठरली असल्याचे पाहायला मिळाले. या जोडीनेदेखील बॉलिवुडमध्ये कित्येक चित्रपट केले आहेत. या जोडीचे ओम शांत ओम, चलो इश्क लढाये, प्यार दिवाना होता है, हद कर दी अपनी असे अनेक चित्रपट हीट ठरले आहेत. बॉलिवूडची या अभिनेत्रीनेदेखील इंडस्ट्रीवर राज केले आहे. गोविंदा - उर्मिला मातोंडकर - या जोडीनेदेखील नव्वदीचा काळ गाजविला आहे. बॉलिवूडची तगडी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मराठमोळया अभिनेत्रीने गोविंदासोबत कुवारा, हम तुम पे मरते है, दिल्ली सफारी असे अनेक चित्रपट केले आहेत. बॉलिवूडच्या हीट अभिनेत्रींमध्ये उर्मिलाचे नाव आर्वुजुन घेतले जाते.