Join us

कोटींची कमाई करणाऱ्या रणवीर सिंगने ड्रायव्हरचा दोन महिने पगार रखडवला.. त्यानंतर झाले असे काही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:06 IST

रणवीर सिंग आपल्या बिनधास्त अंदाजामुळे बी टाऊनमध्ये फेमस आहे. कोणत्या ही इव्हेंटच्या ठिकाणी तो आपल्या दुलखुलास अंदाजात उपस्थितांची मनं ...

रणवीर सिंग आपल्या बिनधास्त अंदाजामुळे बी टाऊनमध्ये फेमस आहे. कोणत्या ही इव्हेंटच्या ठिकाणी तो आपल्या दुलखुलास अंदाजात उपस्थितांची मनं जिंकून घेतो. आता बातमी अशी आहे की बाजीराव फेम रणवीर सिंगने त्याच्या ड्रायव्हरला गेल्या दोन महिन्यांचा पगार थवला आहे  आणि तो  पगार मागायला गेला तेव्हा रणवीरच्या अंगरक्षकाने त्याला मारहाण केली आणि कामावरून काढून टाकले. सविस्तर वृत्त असे की रणवीर सिंग चित्रपट पद्मवतीच्या शूटिंग दरम्यान रणवीरचा अंगरक्षक आणि ड्रायवर यांच्यात वाद झाला. अनेकांनी दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या दोघे ही ऐकायला तयार नव्हते.  प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार ड्रायव्हर सूरज रणवीर सिंगच्या मॅनेजरकडे आपला पगार मागत होता पण मॅनेजर त्याच्याकडे दुर्लक्षित करत होता शेवटी ड्रायव्हर सूरजचा संयम सुटला आणि त्याने आवाज चढवण्यास सुरवात केली तेव्हा रणवीर सिंगच्या अंगरक्षकाने त्याला सेटवरून बाहेर जाण्यास सांगितले त्याने जाण्यास नकार दिल्यावर आणि मग रणवीरच्या  अंगरक्षकाने त्याला मारण्यास सुरवात केली हा प्रकार जेव्हा पद्मावतीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कळली तेव्हा त्यांनी त्याला त्याचा पगार मिळवण्याचा विश्वास दिला. ड्रायव्हर सूरजला रणवीर सिंग त्याचा दोन महिन्यांचा पगार रु ८५,००० देणं आहे. त्यासाठी सूरज रणवीरच्या बहिणीला सुद्धा भेटला पण त्याचा काही फायदा झाला नाही. यानंतर रणवीरबाबत अनेक उलट सुलट्या चर्चा सुरु झाल्या आहेत.ALSO READ :  Padmavati First Look: सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा ‘लूक’ आला ! सोशल मीडियावर रणवीर सिंह ‘हिट’!!रणवीर सिंग बॉलिवूडच्या  अशा अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये आहे जे एक चित्रपटासाठी कोटींचे मानधन आकारतात.  रणवीरने तर पद्मावतीसाठी तब्बल तेरा कोटींचे मानधन आकारल्याची चर्चा आहे. मग एवढे असून सुद्धा रणवीर आपल्या ड्रायव्हर  पगार देऊ शकत नाही यावर विश्वास बसत नाहीय. ड्रायव्हर सूरजने याबाबत युनियन मध्ये तक्रार यांसदर्भात तक्रार दाखल करण्याचे ठरवले आहे. आज सकाळीचा रणवीर सिंहचा पद्मावतीमधला अलाऊद्दीन खिल्जीचा लूक सगळ्यांचा समोर आला आहे. यात रणवीर सिंगसह दीपिका पादुकोण, शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.