रणवीर-वाणीची ‘बेफिक्रे’ शूटिंगदरम्यान धम्माल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 10:47 IST
तुम्हाला हिंदी चित्रपटांची आवड असेल तर लक्षात येईल की, रणवीर सिंगची बॉलीवूडमध्ये अतिशय फास्ट घोडदौड सुरू झाली आहे. ...
रणवीर-वाणीची ‘बेफिक्रे’ शूटिंगदरम्यान धम्माल!
तुम्हाला हिंदी चित्रपटांची आवड असेल तर लक्षात येईल की, रणवीर सिंगची बॉलीवूडमध्ये अतिशय फास्ट घोडदौड सुरू झाली आहे. त्याचा पॉवरफुल परफॉर्मन्स, पॉवरफुल पर्सनेलिटी, हॉट स्क्रीन प्रेझेन्स यामुळे त्याचे नाव सध्या सर्वांत यशस्वी अभिनेत्यांमध्ये घेतले जाते.त्याच्या बिनधास्त अॅटीट्यूडमुळे त्याला बिग बजेट चित्रपट मिळत आहेत. तो सध्या त्याचा आगामी चित्रपटासाठी पॅरीस येथे शूटिंग करत आहे. त्याचा एक फोटो नुकताच आऊट करण्यात आला आहे.त्यात तो पॅरिस येथील काही तरूण युवक -युवतींसोबत वाणी कपूरसह दिसत आहे. तो पॅरिसमध्ये शूटिंग करणे एन्जॉय करतो आहे.