Join us  

रोहित शेट्टीसाठी रणवीर सिंगने केले असे वक्तव्य, ऐकून तुम्हाला वाटेल रणवीरचे कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 6:30 AM

रणवीर सिंगने 'सिम्बा'चा दिग्दर्शक रोहित शेट्टीसाठी भाषण तयार केले आहे.

ठळक मुद्दे'सिम्बा' सिनेमा २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता रणवीर सिंग नुकताच दीपिका पादुकोणसोबत विवाहबंधनात अडकला आहे. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. मात्र आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत 'सिम्बा'च्या टीमने बिहाइंड द सीन पाहायला मिळत आहे. सोबतच रणवीर सिम्बाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीसाठी भाषण तयार केले आहे. 

रणवीर म्हणाला की, 'मला भाषण द्यायला अजिबात आवडत नाही. विशेष करून कोणत्या ओकेशनवर जेव्हा एखादे काम आटपल्यावर. मात्र आज मला काहीतरी बोलायचे आहे. मी नेहमीच सरांचा खूप मोठा चाहता आहे आणि विचार करायचो की यार किती चांगले होईल जर मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर आणि मला ही संधी मिळाली. प्रत्येक दिवस माझा अनुभव हजारोंनी वाढत गेला.मी त्यांच्याकडून जी गोष्ट शिकलो ती माझ्यासोबत कायम राहणार आहेत. जेव्हा सगळ्यांची मेहनत एकत्रित येते तेव्हा 'सिम्बा'सारखा चित्रपट बनतो.'

'सिम्बा' चित्रपटात रणवीर सिंग सोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे. ३ डिसेंबरला 'सिम्बा'चा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे व २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सिम्बारणवीर सिंगकरण जोहररोहित शेट्टी