रणवीर सिंगचा आवडत्या यादीत 'पद्मावत' आणि 'बाजीराव मस्तानी' नाही तर हा चित्रपट आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 14:51 IST
बॉलिवूडची सध्याची हिट जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अनेक दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत ही गोष्ट तर ...
रणवीर सिंगचा आवडत्या यादीत 'पद्मावत' आणि 'बाजीराव मस्तानी' नाही तर हा चित्रपट आहे
बॉलिवूडची सध्याची हिट जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अनेक दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत ही गोष्ट तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर वादाने वेढलेला पद्मावत चित्रपट आता यशस्वी ठरला असल्याने सध्या ते दोघे खूप आनंदित आहे. ह्याच वेळेस त्यांच्या दोघांच्या लग्नाची बातमी सुद्धा सगळीकडे वाऱ्यासारखी पसरते आहे. सूत्रानुसार ते दोघे याच वर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत, ते दोघे डेस्टिनेशन वेडींगचे प्लांनिंग करत आहेत. लग्ना आधी दीपिका- रणवीरच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी त्यांना आवड आणि निवड विचारण्यात आली.दीपिकाला एक मुलाखतीमध्ये तिला विचारले की "पद्मावत, बाजीराव आणि रामलीला सोडून रणवीरला तिचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला आहे ? तेव्हा तिचे उत्तर आश्चर्यकित करण्यासारखेच होते. रणवीरला दीपिकाचा कोणता चित्रपट आवडतो ह्या प्रश्नाचे उत्तर पद्मावत, बाजीराव मस्तानी, रामलीला ह्यांपैकी एक असेल असे सर्वाना वाटते पण हे उत्तर चुकीचे आहे . रणवीर ला दीपिकाचा 'पिकू' हा चित्रपट आवडतो ह्या चित्रपटात दीपिकाने अमिताभ बच्चन आणि इरफान खान बरोबर काम केले होते आणि तिच्या अभिनयाचे फार कौतूक सुद्धा झाले होते. रणवीरला तिचा पिकू चित्रपट सर्वांत जास्त आवडतो ही गोष्ट दीपिकाला बरोबर माहिती आहे. हाच प्रश्न दीपिकाला विचारला असता दीपिकाने तिचा रणवीर चा आवडता चित्रपट 'लुटेरा' आहे असे सांगितले. ALSO READ : ‘या’ हॉलिवूड अभिनेत्यासोबत ‘लव्ह सीन्स’ द्यायलाही तयार आहे दीपिका पादुकोण!तुम्हाला सांगू इच्छितो की विवादित चित्रपट पद्मावत यशस्वी ठरला असून तो २०० करोड कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत जाऊन बसला आहे. ह्या वर्षी रणवीर आणि दीपिका लग्न करणार असल्याची चर्चा जोरात चालू आहे ते विराट-अनुष्कासारखे डेस्टिनेशन वेडींग प्लॅन करत आहेत कदाचित ते दोघे लग्नासाठी बीचची जागा निवडतील असे वाटते करण दोघांना ही बीच वर फिरायला फार आवडते, जरी लग्नाची तारीख ठलेली नसली तरी ह्या लग्नात केवळ कुटुंब आणि जवळचे मित्रपरिवार शामिल होतील