Join us

रणवीर सिंग झळकणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:46 IST

बँड बाजा बरात या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केलेला अभिनेता रणवीर सिंग लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहे. छोट्या पडद्यावर अनेक ...

बँड बाजा बरात या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केलेला अभिनेता रणवीर सिंग लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहे. छोट्या पडद्यावर अनेक चांगले कार्यक्रम येत असून मलाही छोट्या पडद्याचा भाग व्हायला आवडेल असे त्याने नुकतेच म्हटले आहे. रणवीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहात आहे. छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी जे काही कौशल्य लागते, ते सर्व काही माझ्याकडे असल्याची मला खात्री आहे. मला गेल्या तीन वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी अनेक ऑफर्स येत आहेत. पण सध्या मी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने छोट्या पडद्यासाठी माझ्याकडे तारखाच नाहीयेत. मला अनेक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या ऑफर्स आल्या होत्या आणि हे सगळेच कार्यक्रम खूपच चांगले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला मला खूपच आवडले असते. पण काही गोष्टी जुळून न आल्याने मला छोट्या पडद्यावर एंट्री करता आली नाही. छोट्या पडद्यावर काम करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. त्यामुळे भविष्यात काहीही केल्या छोट्या पडद्यावर काम करायचे असे मी ठरवले आहे. 2017चे संपूर्ण वर्षं मी माझ्या चित्रपटांच्या चित्रीकरणात बिझी असणार आहे. पण 2018ला छोट्या पडद्यासाठी वेळ काढायचा असे मी आताच ठरवले आहे.रणवीरने छोट्या पडद्यावर काम केले नसले तरी द कपिल शर्मा शो, सुपर डान्सर यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी त्याने हजेरी लावलेली आहे.