Join us  

Ranveer Singh : स्कोर क्या है... रणवीर सिंगच्या '83' सिनेमाचा 'रोमहर्षक' ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 9:57 AM

रणवीर सिंगचा सवाल, स्कोर क्या है... आणि 9 रन 4 विकेट डाऊन हे पंकज त्रिपाठीचं उत्तर पाहिल्यानंतर आता पुढे काय, असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो.

ठळक मुद्देजीतेगाही जितेगा इंडिया जीतेगा... या गाण्यासह चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यामधील कपिल देव म्हणजेच रणवीर सिंगचे फटके पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. 

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा (Ranvir Singh) ‘83’ या सिनेमाची प्रतीक्षा संपली आहे. येत्या 24 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याआधी या चित्रपटाचा टीझर रिलीज (Teaser Released) झाला होता. साहजिकच, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यानंतर, आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रणवीर सिंगने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. तसेच, चाहत्यांना आवाहनही केलंय. 

‘83’चा टीझर पाहून 1983 च्या क्रिकेटप्रेमींच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्याच, आठवणींना आणखी उजाळा देणारा हा ट्रेलर आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हीच विजयगाथा सांगणाऱ्या ‘83’ या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. आता, या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला असून तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढवत आहे. 

रणवीर सिंगचा सवाल, स्कोर क्या है... आणि 9 रन 4 विकेट डाऊन हे पंकज त्रिपाठीचं उत्तर पाहिल्यानंतर आता पुढे काय, असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो. 3.50 मिनिटांचा हा ट्रेलर आपणास 1983 च्या लॉर्ड्स मैदानावरच घेऊन जातो. भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा तो सामना आजही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. रोमांचक सामन्यात भारताने विजय मिळवत, विश्वचषकावर पहिल्यादाच भारताचे नाव कोरून इतिहास घडवला होता. जीतेगाही जितेगा इंडिया जीतेगा... या गाण्यासह चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यामधील कपिल देव म्हणजेच रणवीर सिंगचे फटके पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. 

दिपीका साकारतेय कपिलच्या पत्नीची भूमिका

‘83’ हा सिनेमा कबीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत आहे. ताहिर राज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, अदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका आहेत. दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमीची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाचा लूकदेखील व्हायरल झाला होता. दीपिका यामध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसून आली आहे.

रिलायन्स एंटरटेनमेंट, फँटम फिल्म्स आणि कबीर खान फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत ‘83’ हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. 

टॅग्स :कपिल देव८३ सिनेमारणवीर सिंग