Join us  

अंदाज अपना अपना! रणवीर सिंगला खूणावू लागली ‘कॉमेडी’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 3:45 PM

रणवीर सिंग हा बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा सगळ्यात यशस्वी अभिनेता आहे. केवळ इतकेच नाही तर अष्टपैलू कलाकार आहे. विलनपासून तर हिरोपर्यंत अशा अनेक भूमिका त्याने साकारल्या. रणवीरची प्रत्येक भूमिका चाहत्यांनीही डोक्यावर घेतली. आता रणवीर सिंगला कॉमेडी खुणावू लागलीय.

रणवीर सिंग हा बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा सगळ्यात यशस्वी अभिनेता आहे. केवळ इतकेच नाही तर अष्टपैलू कलाकार आहे. विलनपासून तर हिरोपर्यंत अशा अनेक भूमिका त्याने साकारल्या. रणवीरची प्रत्येक भूमिका चाहत्यांनीही डोक्यावर घेतली. आता रणवीर सिंगला कॉमेडी खुणावू लागलीय. होय, तुमचा आमचा लाडका रणवीर पडद्यावर कॉमेडी करण्यास उत्सूक आहे. ट्विटरवरच्या ‘आस्कसिम्बा’ सेशनमध्ये एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना रणवीरने ही इच्छा बोलून दाखवली. कधी कॉमेडी करणार का? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना रणवीरने ‘अंदाज अपना अपना’च्या सीक्वलमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. एखादा दमदार कॉमेडी चित्रपट कुणी मला आॅफर करेल, याची मी प्रतीक्षा करतोय. कदाचित ‘अंदाज अपना अपना2’, असे उत्तर रणवीरने दिले. आता रणवीरने फक्त इच्छाचं व्यक्त केली की हिंट दिली, हे मात्र ठाऊक नाही.

‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले. आमिर खान व सलमान खानच्या या चित्रपटातील विनोदांनी लोकांना खळखळून हसवले. ‘अंदाज अपना अपना’मधून रणवीरही चाहत्यांना हसवू इच्छित असेल, तर त्याची ही इच्छा लवकर पूर्ण होवो, अशीच कामना करूयात.

तूर्तास रणवीर ‘सिम्बा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर व सारा अली खानचा रोमॅन्टिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘सिम्बा’ हा चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. ‘सिम्बा’ त रणवीरपहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

टॅग्स :रणवीर सिंगसिम्बा