अभिनेता रणवीर सिंग नुकताच भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान टीम इंडियाला चीअर करताना दिसला. त्याने केवळ भारतीय टीमला चीअर केले नाही तर कॉमेंट्रीही केली. अनेक क्रिकेट खेळाडूंसोबत व्हिडिओ आणि सेल्फी घेत धम्माल केली. हे सगळेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. रणवीरनेही यादरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले. पण एक फोटो शेअर करणे रणवीरला चांगलेच महागात पडले. हा फोटो होतो, हार्दिक पांड्यासोबतचा. या फोटोला त्याने, Eat. Sleep. Dominate. Repeat. The name is Hardik. Hardik Pandya असे कॅप्शन दिले होते.
OMG रणवीर सिंगवर चोरीचा आरोप! WWE रेसलरच्या वकीलाने घेतली शाळा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 10:29 IST
एक फोटो शेअर करणे रणवीरला चांगलेच महागात पडले. हा फोटो होतो, हार्दिक पांड्यासोबतचा.
OMG रणवीर सिंगवर चोरीचा आरोप! WWE रेसलरच्या वकीलाने घेतली शाळा!!
ठळक मुद्दे आता पॉल खरोखरच रागात बोलला की तो रणवीरची मस्करी करत होता, हे माहित नाही. पण अद्याप रणवीरने त्याच्या या ट्वीटचे उत्तर दिलेले नाही.