Join us  

रणवीर सिंग या कारणामुळे भडकला सूर्यवंशीच्या ट्रेलर लॉचिंगला, अक्षय कुमार आला मदतीला धावून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 5:48 PM

सूर्यवंशीचा ट्रेलर पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पत्रकाराने रणवीर सिंगला एक प्रश्न विचारला असता तो चांगलाच भडकला.

ठळक मुद्देसूर्यवंशी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पत्रकाराने रणवीर सिंगला विचारले की, आप खुदको बॉलीवुड में सबसे ज्यादा कमीना मानते है क्या?

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर अखेर लॉन्च झाला. मुंबईत धमाकेदार अंदाजात हा ट्रे्लर लाँच सोहळा पार पडला. यावेळी रोहित शेट्टी, अजय देवगण, अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग, करण जोहर उपस्थित होते. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्यावेळी हे सगळेच मजा-मस्तीच्या मुडमध्ये होते. पत्रकारांसोबत देखील त्यांनी खूपच साऱ्या गप्पा मारल्या. पण त्याचवेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे रणवीर सिंग चांगलाच भडकला. पण अक्षयने लगेचच त्याची समजूत काढली.

सूर्यवंशी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पत्रकाराने रणवीर सिंगला विचारले की, आप खुदको बॉलीवुड में सबसे ज्यादा कमीना मानते है क्या? (तुम्ही स्वतःला बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त कमीना असल्याचे मानता का?) हा प्रश्न रणवीर सिंगला आवडला नसल्याचे त्याच्या देहबोलीवरूनच कळत होते. त्याने हसतच उत्तर दिले की, माझा इतका मोठा अपमान झाल्यानंतर आता मी येथे थांबणार नाही... त्यावर अक्षयने मध्यस्ती करत लगेचच म्हटले की, हे वाक्य केवळ चित्रपटातील एक संवाद आहे... याचा खऱ्या जीवनाशी काहीही संबंध नाहीये... तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र करू नका... अशाप्रकारे दोन्ही गोष्टी एकत्र करणे खूपच चुकीचे आहे. 

अक्षयने पत्रकाराला उत्तर दिल्यानंतर रणवीर प्रचंड खूश झाला आणि तो म्हणाला की, माझा मित्र अक्की... मला नेहमीच वाचवायला येतो... 

अक्षय कुमारची धमाकेदार अ‍ॅक्शन, कतरीनासोबतची त्याची रोमॅन्टिक केमिस्ट्री आणि रणवीर सिंग आणि अजय देवगणची सरप्राईज एन्ट्री असा सूर्यवंशीचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर आहे. ट्रेलरमध्ये ‘सूर्यवंशी’च्या कथेची झलक पाहायला मिळते. एटीएस अधिकारी असलेला अक्षय देशासाठी काहीही करू शकतो याचदरम्यान अक्षयला एका अज्ञात हल्ल्याबद्दल कळते. ट्रेलरच्या शेवटी रणवीर सिंगची एन्ट्री होते आणि यानंतर सिंघम अर्थात अजय देवगणही धमाकेदार एन्ट्री घेतो. ट्रेलरमधील अक्षयची अ‍ॅक्शन दमदार आहे. अक्षयला पुन्हा या रूपात पाहणे इंटरेस्टिंग आहे. ट्रेलरमध्ये नीना गुप्ता, गुलशन ग्रोव्हर, सिकंदर खेर, जॅकी श्रॉफ यांचीही झलक पाहायला मिळते. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. येत्या 24 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :सूर्यवंशीअक्षय कुमाररणवीर सिंग