Join us  

राजकुमार संतोषींच्या चित्रपटात आता सलमान खान नाही तर रणवीर सिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 6:00 AM

सध्या रणवीर ‘83’ या चित्रपटात व्यग्र आहे आणि यानंतर लगेच राजकुमार संतोषींच्या चित्रपटात तो बिझी होणार आहे.

ठळक मुद्देराजकुमार संतोषींच्या या आगामी चित्रपटाबद्दल अधिक तपशील बाहेर आलेला नाही. पण मध्यंतरी संतोषी ‘अंदाज अपना अपना’च्या सीक्वलवर काम सुरु करणार, अशी चर्चा होती.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या यशाच्या शिखरावर आहे.  गतवर्षी ‘पद्मावत’ आणि ‘सिम्बा’ हे त्याचे दोन सिनेमे रिलीज झालेत आणि या दोन्ही चित्रपटांनी  धुव्वाधार कमाई केली. नुकताच प्रदर्शित झालेला रणवीरचा तिसरा चित्रपट ‘गली बॉय’ हाही सुपरडुपर हिट ठरला. सध्या रणवीर ‘83’ या चित्रपटात व्यग्र आहे आणि यानंतर लगेच राजकुमार संतोषींच्या चित्रपटात तो बिझी होणार आहे.

होय, ताजी बातमी हीच आहे.  बातमी खरी मानाल तर रणवीरने सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा एक चित्रपट साईन केला आहे. काही दिवसांपूर्वी संतोषी यांनी रणवीरला आपल्या चित्रपटाची आॅफर दिली होती आणि रणवीरने ती लगेच स्वीकारली. इतकेच नाही तर येत्या डिसेंबरपासून या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करण्याची तयारीही दर्शवली.

राजकुमार संतोषींच्या या आगामी चित्रपटाबद्दल अधिक तपशील बाहेर आलेला नाही. पण मध्यंतरी संतोषी ‘अंदाज अपना अपना’च्या सीक्वलवर काम सुरु करणार, अशी चर्चा होती. या चित्रपटात दोन हिरो असतील, असेही म्हटले गेले होते. कदाचित याच चित्रपटासाठी संतोषींनी रणवीरला साईन केले असावे, अशी शक्यता अधिक आहे. या चित्रपटातून राजकुमार संतोषी एका टीव्ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार, असेही कळतेय. यासाठी संतोषी काही कास्टिंग डायरेक्टर्सची मदत घेत असल्याचेही समजतेय. एकंदर काय तर, संतोषींच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि आता रणवीरची एन्ट्री म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय.

टॅग्स :रणवीर सिंग