‘मला ‘पद्मावत’साठी माझा पहिला पुरस्कार मिळाला. मिस्टर बच्चन याचे पत्र मिळालेय. त्यांचे हे पत्र आणि त्यांनी पाठवलेली फुलांची भेट माझ्यासाठी काय आहेत, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. मिस्टर बच्चन मला कायम आपलेसे वाटत आले आहेत. प्रत्येकवेळी माझ्या अभिनयाचे कौतुक करण्यासाठी ते स्वत: हाताने लिहिलेले पत्र पाठवतात. मला जेव्हा केव्हा त्यांचे पत्र मिळते, मी ते फ्रेम करतो. यानंतर ती फ्रेम थेट बँक लॉकरमध्ये जाते. मी ती फ्रेम केलेली पत्रे घरी ठेवू शकत नाही. त्यांची ही शाब्बासकीची थाप माझ्यासाठी अनमोल आहे. माझे सगळे अवार्ड्स घराच्या कपाटात रचलेले दिसतील. पण अमिताभ यांनी लिहिलेली पत्रे मी बँक लॉकरमध्ये ठेवली आहेत, असे रणवीरने लिहिलेयं.
अर्थात अमिताभ पहिल्यांदा रणवीरच्या अभिनयावर भाळलेले नाहीत. यापूर्वीही त्यांनी रणवीरला असेच स्वहस्ताक्षरातील पत्र आणि फुले पाठवली होती. होय, २०१५ मध्ये ‘बाजीराव मस्तानी’मधील अभिनयासाठी त्याला अमिताभकडून असेच सरप्राईज मिळाले होते.
ALSO READ : भन्साळींचा ‘खिल्जी’ रणवीर सिंगने चाहत्यांसाठी लिहिला १७१ शब्दांचा सुंदर संदेश! तुम्हीही वाचा!!
‘पद्मावत’ने पहिल्याच वीकेंडमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने ११४ कोटी कमावले आहेत. ‘पद्मावत’ शूटींगच्या पहिल्या दिवसापासूनच वादात सापडला होता. या वादामुळे चित्रपटाचे रिलीज दोनदा पुढे ढकलावे लागले होते. अखेर अनेक वादानंतर गत २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज झालाय.