Join us  

रणवीर शॉर्टलिस्ट करतोय लहान बाळांची नावं? फॅमिली प्लॅनिंगविषयी उघड केलं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 6:07 PM

Ranveer singh:या दोघांच्याही प्रोफेशनल लाइफपेक्षा त्यांची पर्सनल लाइफ जास्त चर्चिली जाते. त्यामुळेच ही जोडी आई-बाबा कधी होणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

ठळक मुद्देसध्या रणवीर त्याच्या 'द बिग पिक्चर' या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत येत आहे.

बॉलिवूडमधील (bollywood)  'पॉवर कपल' म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) आणि दीपिका पदुकोण (deepika padukon). बेधुंद अंदाजासाठी ओळखला जाणारा रणवीर आणि त्याच्या प्रत्येक अंदाजावर मनसोक्त प्रेम करणारी दीपिका ही जोडी म्हणजे कलाविश्वातील एक वेगळंच समीकरण आहे. या दोघांमधील प्रेम चाहत्यांनी अनेकदा अनुभवलं आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून, सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्यातील प्रेम, आपुलकी, आदर दिसून येतं. त्यामुळेच ही जोडी आज लोकप्रिय जोड्यांपैकी ऐक आहे.  विशेष म्हणजे या दोघांच्याही प्रोफेशनल लाइफपेक्षा त्यांची पर्सनल लाइफ जास्त चर्चिली जाते. त्यामुळेच ही जोडी आई-बाबा कधी होणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यातच रणवीरच्या एका व्हिडीओमध्ये चाहते आता चक्रावून गेले आहेत.  हा व्हिडीओ पाहिल्यावर रणवीर खरंच बाबा होणार का हा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. 

सध्या रणवीर त्याच्या 'द बिग पिक्चर' या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत येत आहे. या शोच्या माध्यमातून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं असून सध्या या शोचा प्रोमो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये रणवीरने त्याच्या फॅमिली प्लॅनिंगविषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. एका कुटुंबासोबत फॅमिली प्लॅनिंगवर चर्चा करत असताना त्याने त्याच्या कुटुंबाविषयीदेखील काही गोष्टी उघड केल्या.

"आता तुम्हाला सगळ्यांनाच ठावूक आहे की माझं लग्न झालंय आणि येत्या २-३ वर्षात आम्हाला मुलंदेखील होतील. दादा..तुमची वहिनी ( दीपिका) इतकी गोड मुलगी आहे ना की, मी रोज तिच्या लहानपणीचा फोटो पाहतो.आणि, म्हणतो, बास्स..मला अशीच एक गोड मुली दे म्हणजे माझं आयुष्य सेट होऊन जाईल. सध्या मी लहान बाळांची नावं शॉर्टलिस्ट करतोय. जर मी या लिस्टमध्ये तुमचं शौर्यवीर सिंह नाव अॅड केलं तर तुम्हाला काही अडचण नाहीये ना?", असं रणवीर या शोमध्ये स्पर्धकाला विचारतो.

दरम्यान, रणवीरची मुख्य भूमिका असलेला '83'  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीरने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर दीपिकाने त्यांच्या पत्नीची भूमिका वठवली आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणसिनेमासेलिब्रिटी