Join us  

लग्नसोहळ्यात रणवीर सिंह दीपिकाच्या सँडल्स घेऊन फिरला, तर क्युट फोटोंवर तरूणी झाल्या फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 2:45 PM

दीपिकाची दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे सा-या जगाला माहिती आहे. त्यामुळे कधीही कुठेही इतरांनाही त्यांच्या दोघांच्या प्रेमाची प्रचिती ही येतेच. नुकतेच एका विवाहसोहळ्यात रणवीर दिपिकाने हजेरी लावली होती. यावेळी दीपिकाने व्हाईट फ्लोरल रंगाची साडी परिधान केली होती. आणि रणवीरने इंडो- वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता.

अचानक दीपिकाला साडीत हिल्स असलेल्या सँडलने चालणे अशक्य होत होते. म्हणून खुद्द रणवीरनेच दीपिकाचे सँडल हातात घेऊन फिरताना पाहायला दिसला. जोपर्यंत दीपिकाचे सगळ्या आप्तेष्ठांना भेटून होत नाही तोपर्यंत तो तिचे सँडल सांभाळताना दिसला. रणवीरचा हा क्युट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. रणवीरचा हा फोटो पाहून तुम्हालाही 'नशा है प्यार का नशा हैं...'' असे वाटल्याशिवाय राहणार नाही.

मात्र दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. रणवीर दीपिकाची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. विशेष म्हणजे आपल्या लेडी लव्ह दीपिकासाठी रणवीर जरा जास्तच पझेसिव्ह असल्याचंही वेळोवेळी पाहायला मिळतं. तुर्तास रणवीरचा हा फोटोने विशेषतः तरूणींना अधिक भुरळ घातली आहे. हा फोटो पाहून तरूणी देखील रणवीर सारखाच नवरा मिळावा असे स्वप्न रंगवत असणार.

 

नुकतेच सोनम कपूर आणि आनंद अहुजा या दोघांचाही असाच एक फोटो व्हायरल झाला होता. सोनम बुट ट्राय करत असताना आनंदने काय करावे, तर चक्क सर्वांसमोर तिची बुटांची लेस बांधून दिली. दिल्लीच्या एका शू स्टोरच्या लॉन्चिंगदरम्यानचा हा फोटो होता. आनंद सोनमच्या बुटांची लेस बांधत होता तर सोनम मनातल्या मनात चक्क लाजत होती. स्टोरमधील अख्खे लोक दोघांकडे बघत होते. पण पत्नीच्या बुटांची लेस बांधण्यात मग्न असलेल्या आनंदला याची जराही पर्वा नव्हती. सोनमने अगदी योग्य जोडीदार निवडला अशा अनेक प्रतिक्रिया हा फोटो पाहून उमटल्या होत्या. 

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण