बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. परिणीती सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. सोशल मीडियावर परिणीतीचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. नुकतेच परिणीतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आस्क मी एनिथिंग या सेशनमधून चाहत्यांशी संवाद साधला होता. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना परिणीतीने बेधडकपणे उत्तर दिली आहेत.
आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये एका चाहत्याने परिणीतीला तिच्याबद्दल प्रश्न विचारायचे सोडून तिला रणवीर सिंगबद्दल प्रश्न विचारला. त्यावर परिणीतीने देखील चाहत्याला उत्तर दिले. एका चाहत्याने विचारले की रणवीर सिंग बाबा झाला?. यावर परिणीती चोप्राने रणवीर सिंगला टॅग करत रणवीरकडूनच कन्फर्म करून घे असे सांगितलं. त्यामुळे चाहते आता रणवीर आणि दीपिका पादुकोण गोड बातमी कधी देणार याची वाट पाहत आहेत.
आता तिचा लवकरच अॅनिमल हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात परिणीती सोबत रणबीर कपूर आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.