Join us

​‘डेट नाईट’ला झाले रणवीर सिंग अन् दीपिका पादुकोणचे कडाक्याचे भांडण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 15:58 IST

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या दोघांमध्ये काय सुरु आहे, नक्की कळायला मार्ग नाही. अधून-मधून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येतात. ...

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या दोघांमध्ये काय सुरु आहे, नक्की कळायला मार्ग नाही. अधून-मधून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येतात. या बातम्या दीपिका व रणवीरच्या चाहत्यांचा हिरमोड करतात आणि मग अचानक काही झालेच नाही, अशा थाटात रणवीर व दीपिका दोघेही पुन्हा एकत्र दिसतात. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की काय सुरु आहे, हेच चाहत्यांना कळत नाही. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या ब्रेकअपची चर्चा होती. रणवीर सिंगला लग्न करुन सेटल व्हायचे आहे तर दीपिकाला म्हणे करिअरवर लक्षक्रेंदीत करायचे आहे, नेमक्या याच कारणावरून दोघांमध्येही मतभेद निर्माण झाल्याची चर्चा या काळात रंगली होती.  याच मतभेदामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले गेले होते. यानंतर अनेक दिवस रणवीर व दीपिकाच्या ब्रेकअपच्या  चर्चा न्यून पेपरच्या हेडलाईन बनल्या होत्या. अर्थात यानंतर काहीच दिवसांत रणवीर व दीपिकाचा फोटो व्हायरल झाला होता. यात दोघेही एकमेकांना किस करताना दिसले होते. त्या फोटोनंतर दोघांचाही एक व्हिडिओ समोर आला होता.  या व्हिडिओत दीपिका अलगद रणवीरच्या मिठीत शिरलेली  दिसली होती. पण आता एक वेगळीच खबर आहे.ALSO READ: दीपिका पादुकोणच्या ‘सौतन’ची होतेय, जोरदार चर्चा... जाणून घ्या, कोण आहे ही मिस्ट्री वूमन!!होय, ‘पिंकविला’ने दीपिका व रणवीरच्या भांडणाची बातमी दिली आहे.  काही दिवसांपूर्वी एका मोठ्या रेस्तराँमध्ये रणवीर- दीपिका डेटवर गेले होते. पण, त्या ‘डेट नाईट’ला दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, असे या वृत्तात म्हटले आहे. आता या भांडणाचे कारण काही आम्हाला ठाऊक नाही. पण ‘डेट नाईट’ला भांडण म्हटल्यावर तसलेच काहीसे सीरिअस असणार. खरे तर रणवीर व दीपिकाच्या नात्याने आत्तापर्यंत अनेक चढऊतार पाहिले आहेत. याऊपरही त्यांचे नाते कायम आहे. भविष्यातही हे नाते असेच कायम राहावे, अशीच चाहत्यांची इच्छा आहे.लवकरच रणवीर व दीपिका ‘पद्मावती’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीच्या तर रणवीर सिंग अल्लाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत असणार आहे.