लतादीदींच्या हस्ते रणवीरचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 08:53 IST
रणवीर सिंगचे नशीब सध्या जोरावर आहे. पठ्ठ्या ज्या गोष्टीला स्पर्श करतोय ती सोनं होतेय असेच म्हणावे लागेल. त्याच्या ‘बाजीराव-मस्तानी’ने ...
लतादीदींच्या हस्ते रणवीरचा सन्मान
रणवीर सिंगचे नशीब सध्या जोरावर आहे. पठ्ठ्या ज्या गोष्टीला स्पर्श करतोय ती सोनं होतेय असेच म्हणावे लागेल. त्याच्या ‘बाजीराव-मस्तानी’ने न केवळ बॉक्स आॅफिसवर चंगळ कमाई केली तर सर्व पुरस्कार सोहळ्यांतही चांगलीच धूम केली.आता त्यांच्या आनंदाला आणखी एक कारण मिळाले आहे. गानकोकिळ लता मंगेशकर यांनी नुकतीच घोषणा केली यंदाच्या ‘पं. दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कारासाठी रणवीर सिंगची निवड करण्यात आली आहे. 24 एप्रिल रोजी पुण्यात होणाºया दिमाखदार सोहळ्यात रणवीरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.जारी केलेल्या निवेदनात लता मंगेशकर यांनी म्हटले की, रणवीर हा उत्तम अभिनेता असून खूप सकारात्मक माणूसदेखील आहे. जिथे जाईल तिथे तो सर्वांना आनंदी करतो. त्यामुळे अशा अभिनेत्याला पुरस्काराने सन्मानित करण्यास आम्हीदेखील आनंदी आहोत. लतादीदींचे वडील पं. दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत मानाच समजला जातो. दरवर्षी एका कलाकाराला तो त्यांच्या पुण्यतिथीला प्रदान करण्यात येतो.