रणवीर फेरतोय भन्साळीच्या मनसुब्यांवर पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 21:27 IST
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या आगामी पद्मावती या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. दरम्यान या चित्रपटातील पात्रांचा लूक व्हायरल होऊ ...
रणवीर फेरतोय भन्साळीच्या मनसुब्यांवर पाणी!
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या आगामी पद्मावती या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. दरम्यान या चित्रपटातील पात्रांचा लूक व्हायरल होऊ नये असे वाटत असल्याने भन्साळी यांनी सेटला अभेद्द किल्याच्या रूप दिले आहे अशा बातम्या चर्चेत आहे. मात्र दुसरीकडे रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये वावरताना एका खास लूक मध्ये दिसत असल्याने भन्साळी यांच्या मनसुब्यावर पाणी फेरताना दिसतो आहे. विशेष म्हणजे त्याचा हा लूक पद्मावतीमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूडचा बाजीराव अशी ओळख मिळविणारा रणवीर सिंह आगळ्या वेगळ्या लूकमुळे चांगलाच चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याचा लूक बदललेला दिसतो आहे. रणवीर सिंगच्या लूकची पार्श्वभूमी पाहिल्यास जशी भूमिका तो साकारत आहे तसे दिसण्याचा प्रयत्न करतो. याचमुळे त्याचा हा लूक चर्चेत आला आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात त्याचा लूक पाहून आश्चर्य वाटले. काळ्या आऊटफीटमध्ये पोहचलेला रणवीर सिंगने आपल्या डोळ्यात काजळ लावले होते. Read More : High Alert : भन्साळींना का वाटतेय इतकी भीती? त्याचा हा लूक पाहून असा अंदाज लावला जात आहे की, रणवीरचा हा लूक पद्मावतीमधील अलाउद्दीनचा असू शकतो. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात रणवीर सिंग दिल्लीचा सम्राट अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे. यात तो पद्मावतीच्या (दीपिका पादूकोण) प्रेमात बुडालेला दिसणार आहे. रणवीरने काही दिवसांपूर्वी ट्विटरहून आपल्या डोळ्यांचा फोटो अपलोड करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. त्या ट्विटच्या फ ोटोमधील डोळे व रणवीरचा उमंगमधील लूक जवळपास सारखाच असल्याने हा अंदाज लावला जात आहे. Read More : रणवीर सिंगची ‘कार्बन कॉपी’ आहे तरी कोण? एकीकडे संजय लीला भन्साळी ‘पद्मावती’तील लूक लीक होऊ नये यासाठी हा सगळा खटाटोप करीत आहे. यासाठी चित्रपटाच्या क्रू मेंबर्सवरही बारीक नजर ठेवली जात आहे. त्यांच्या बॅग आणि अन्य सामानाची तपासणी करण्यात येत आहे. जेणेकरून कॅमेरा वा मोबाईल सेटवर पोहोचू नये. सेटवरच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भन्साळींनी सेटवर सुरक्षा वाढवली आहे. कॅमेरा वा कॅमेरा असलेला मोबाईल सेटवर नेण्याची परवानगी नाही. दीपिका व शाहिद या दोघांचाही चित्रपटातील लूक एकदम जबरदस्त असल्याचेही या सूत्राने सांगितले. मात्र रणवीर बिनधास्तपणे अलाउद्दीनच्या लूकमध्ये वावरताना दिसत आहे. ALSO READ : रणवीर सिंग बनला ‘एक दिन का पोलिसावाला’‘पद्मावती’ टीमकडून झाले दुर्लक्ष ; सेटवर कामगाराला गमवावा लागला जीव!