रणवीर दिपीकासोबत श्रीलंकेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 11:00 IST
आपल्याला तर माहितीच आहे की, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. दीपिका पदुकोन श्रीलंकेला ...
रणवीर दिपीकासोबत श्रीलंकेत?
आपल्याला तर माहितीच आहे की, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. दीपिका पदुकोन श्रीलंकेला तिच्या मित्राच्या लग्नासाठी गेली आहे. ती सध्या हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी लॉस एन्जॅलिस येथे शूटिंग करत आहे. लग्नासाठी ती भारतात परत आली आहे. नंतर ती श्रीलंकेत लग्नासाठी गेली. आता तर असेही कळाले आहे की, तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंगही श्रीलंकेत तिच्या मागे मागे गेला आहे. त्याने एअरपोर्टवर बरेच फोटोसेशन केले. आणि काही क्लिक्स लग्नाच्या सोहळ्यातील देखील आहेत.त्यांच्या एका चाहत्याने हे फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहेत. आणि त्याला कॅप्शन टाकले आहे की,‘ ही इज देअर! ही इज इन श्रीलंका!! रणवीर इज इन श्रीलंका.’ तो दीपिकावर किती प्रेम करतो याचे चांगलेच उदाहरण आपण पाहतो आहोत.