Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर-दीपिका जाणार हॉलिडेवर??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 16:37 IST

रणवीर सिंह आणि दीपिका गेल्या चार महिन्यांपासून एकमेकांना निवांत भेटलेले नाही. दीपिका हॉलिवूड मुव्हीमध्ये बिझी असल्याने गेल्या चार महिन्यांपासून ...

रणवीर सिंह आणि दीपिका गेल्या चार महिन्यांपासून एकमेकांना निवांत भेटलेले नाही. दीपिका हॉलिवूड मुव्हीमध्ये बिझी असल्याने गेल्या चार महिन्यांपासून भारतात नव्हती. तिकडे रणवीरही पॅरिसमध्ये ‘बेफिक्रे’च्या शूटींगमध्ये बिझी होता. पण आता दीपिका मुंबईत परतली आहे. याचदरम्यान रणवीरचे शूटींगही अखेरच्या टप्प्यात आहे. ते संपवताच रणवीरही मुंबईत दाखल होणार आहे. यानंतर रणवीर व दीपिकाचा हॉलीडेवर जाण्याचा प्लॅन आहे. होय, दोघांनीही लहानसा ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, या ट्रीपमध्ये दीपिका व रणवीरचे कुटुंबही जॉईन होणार आहे. म्हणजे कुटुंबासोबत रणवीर-दीपिका धम्माल करणार आहेत. यानंतर दोघेही आपआपल्या कामाला लागणार आहे. सध्या तरी दीपिका व रणवीर कुठे सुट्टीला जाणार, हे अद्याप कळलेले नाही. दीपिकाच्या टीमने या बातमीवर बोलणे टाळले. तिकडे रणवीरच्या टीमशी संपर्क साधला असता त्यांनीही ‘नो कमेंट्स’ म्हणून वेळ मारून नेली..आता खरे काय, ते लवकरच कळेल..तोपर्यंत चिल्ड...