Join us

​रणवीर-दीपिकाला त्यांच्या नशीबाने जवळ आणले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 11:15 IST

बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत कायम कुर्ता-पायजाम्यात वावरणारे, भव्यदिव्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या हजरतजबाबीपणासाठीही ओळखले जातात. रणवीर ...

बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत कायम कुर्ता-पायजाम्यात वावरणारे, भव्यदिव्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या हजरतजबाबीपणासाठीही ओळखले जातात. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण या हॉट व रिअल लाईफ कपलसोबत भन्साळींनी ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गोलीयों की रामलीला-रासलीला’ हे दोन बिग बजेट चित्रपट केले. ‘गोलीयों की रामलीला-रासलीला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच रणवीर-दीपिका एकत्र आल्याचे मानले जाते. साहजिकच एका मुलाखतीत  भन्साळींना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. भन्साळींनी यावर जोरदार पंच मारला. माझ्या चित्रपटात काम केले म्हणून दीपिका व रणवीर एकत्र आले नाहीत तर त्यांच्या नशीबाने त्यांना एकत्र आणले, असे उत्तर भन्साळींनी दिले. दोघांमध्येही काय नाते आहे, हे मी कधीही रणवीर वा दीपिकाला विचारले नाही. कारण मला केवळ त्यांच्यात माझे बाजीराव -मस्तानी आणि राम-लीला दिसले, हे सांगायलाही भन्साळी विसरले नाहीत.