Join us

​ दीपिकाच्या पाठोपाठ रणवीरही हॉलिवूडच्या वाटेने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 20:54 IST

हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुलदीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षीत हॉलिवूडपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता दीपिकाच्या पाठोपाठ तिच्या सगळ्यात जवळची व्यक्ती ...

हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुलदीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षीत हॉलिवूडपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता दीपिकाच्या पाठोपाठ तिच्या सगळ्यात जवळची व्यक्ती आणि बॉलिवूडचा लोकप्रीय अभिनेता हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याची खबर आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ओळखलतं, रणवीरच तो.  अभिनेता रणवीर सिंह हा लवकरच एका नामवंत हॉलिवूड दिग्दर्शकासोबत दिसणार असल्याची खबर आहे. या हॉलिवूड दिग्दर्शकासोबत  रणवीर एक जाहिरात करतो आहे आणि आता लवकरच त्याच्या चित्रपटात   झळकणार असल्याची चर्चा आहे. याबाबत खुद्द रणवीरलाच विचारल्यावर, त्यानेही याचे अप्रत्यक्ष संकेत दिले. सध्या मी एका नामवंत हॉलिवूड दिग्दर्शकासोबत जाहिरात करतो आहे. पुढे बघू, असे रणवीर म्हणाला. आता रणवीरला यातून काय सांगायचे ते तर येत्या काळात दिसेलच. तोपर्यंत वेट अ‍ॅण्ड वॉच!!