Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रानी का टाळतेय मित्र-मैत्रिणींना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 17:40 IST

नुकतीच आई झालेल्या रानी मुखर्जीचा अलीकडे वाढदिवस झाला. या दिवशी रानीची एक झलक  तरी मिळावी म्हणून मीडिया तिच्या घराबाहेर ...

नुकतीच आई झालेल्या रानी मुखर्जीचा अलीकडे वाढदिवस झाला. या दिवशी रानीची एक झलक  तरी मिळावी म्हणून मीडिया तिच्या घराबाहेर ठाण मांडून बसला. पण आदिराला जन्म दिल्यापासून रानीने मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे. वाढदिवसाच्या दिवशीही तिने मीडियापासून दूर राहणेच पसंत केले. ताज्या बातमीनुसार, राणी पुन्हा एकदा आदिरा आणि पती आदित्यसोबत  काही दिवसांसाठी एका अज्ञात स्थळी राहायला गेली आहे. तिचे बॉलिवूडमधील मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय यांचे फोनही घेणेही ती टाळते आहे. व्वा, रानी...मान गयें...