Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘या’ तारखेला होणार रिलीज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 19:39 IST

राणी मुखर्जी हिचा मर्दानी चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. तिच्या या चित्रपटाचा पुढचा भाग रसिकांच्या भेटीला येणार हे काही महिन्यांपूर्वीच निर्मात्यांनी घोषित केले होते. याबाबतीत ताजी बातमी अशी आहे की, मर्दानी २ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे. 

बॉलिवूडची मर्दानी गर्ल अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. तिच्या या चित्रपटाचा पुढचा भाग रसिकांच्या भेटीला येणार हे काही महिन्यांपूर्वीच निर्मात्यांनी घोषित केले होते. याबाबतीत ताजी बातमी अशी आहे की, मर्दानी २ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे. 

यशराज फिल्म्स यांच्यातर्फे करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनुसार, राणी मुखर्जीचामर्दानी २’ चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यावर्षीच्या सुरूवातीलाच चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. चित्रपटाचा पहिला भाग प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला होता तर दुसरा भाग गोपी पुथरान हे दिग्दर्शित करतील. मर्दानी २ची निर्मिती राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा करणार आहे. राणी मुखर्जीने ‘मर्दानी’ चित्रपटात शिवानी शिवाजी रॉय हिची भूमिका साकारली होती. एका तरूण मुलीच्या शोधात तिने एक सापळा रचलेला असतो यावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. 

टॅग्स :राणी मुखर्जीआदित्य चोप्रा मर्दानी २