Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाबाहेर ‘बबली’ राणी मुखर्जीचा दिसला असा अंदाज, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 20:48 IST

दिग्दर्शक आदित्य चोपडाबरोबर लग्न केल्यानंतर इंडस्ट्रीमधून गायब झालेली राणी मुखर्जी नुकतीच मुंबई विमानतळाबाहेर स्पॉट झाली. वास्तविक राणी कुठल्याही बॉलिवूड ...

दिग्दर्शक आदित्य चोपडाबरोबर लग्न केल्यानंतर इंडस्ट्रीमधून गायब झालेली राणी मुखर्जी नुकतीच मुंबई विमानतळाबाहेर स्पॉट झाली. वास्तविक राणी कुठल्याही बॉलिवूड इव्हेंट किंवा सोशल मीडियावर बघावयास मिळत नाही. त्यामुळे तिची ही झलक चाहत्यांसाठी सर्वच अर्थाने स्पेशल ठरली नसेल तरच नवल. दरम्यान, जेव्हा राणी विमानतळाबाहेर आली तेव्हा तिचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच सुंदर दिसत होती. माध्यमांचे कॅमेरे दिसताच राणीच्या चेहºयावर फुललेले हास्य तिचे सौंदर्य खुलवित होते. राणीच्या या अदा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राणीने एका मुलाखतीत ही बाब मान्य केली होती की, ‘पती आदित्यला पर्सनल लाइफ सोशल करणे अजिबात आवडत नाही. त्यामुळेच राणी लग्नानंतर क्विचितच एखाद्या पार्टीत किंवा इव्हेंटमध्ये बघावयास मिळाली आहे. जेव्हा राणी विमानतळाबाहेर स्पॉट झाली तेव्हा तिने हिरव्या रंगाचे जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. तिचे मोकळे केस तिचे सौंदर्य आणखीनच खुलवित होते. गेल्या तीन वर्षांपासून राणी पडद्यावर झळकली नाही. अशात ती ‘हिचकी’ या चित्रपटातून लवकरच कमबॅक करणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. तसेच याकरिता तिने एक फोटोशूटही केले होते. हे फोटोशूट फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी केले होते. राणीचे हे फोटो त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. ज्यामध्ये राणीचा लूक बघण्यासारखा होता.