Join us

नववर्षात ‘रंगून’चा ट्रेलर येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 12:23 IST

नववर्षाच्या सुरूवातीला अनेक चित्रपट, ट्रेलर लाँच होणाच्या तयारीत आहेत. दिग्दर्शक विशाल भारद्वाज याचा बहुचर्चित ‘रंगून’ चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रेक्षकांच्या ...

नववर्षाच्या सुरूवातीला अनेक चित्रपट, ट्रेलर लाँच होणाच्या तयारीत आहेत. दिग्दर्शक विशाल भारद्वाज याचा बहुचर्चित ‘रंगून’ चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे कळतेय. जानेवारीत चित्रपटाचा पहिला ट्रेलर लाँच होईल. अरूणाचल प्रदेशात चित्रपटाची शूटिंग करण्यात आली असून कंगना राणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांचा तो कथानकात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आलेला आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धावेळी जपानी आर्मीने भारताच्या सीमा ओलांडल्या होत्या, त्यावेळीचे वातावरण, कथानकावर आधारित चित्रपट आहे. हंम्फ्री बोगर्ट आणि इंग्रिड बर्गमॅन या हॉलिवूड कलाकारांचा चित्रपट ‘कॅसाब्लांका’चा ‘रंगून’ हिंदी रिमेक आहे. विशाल भारद्वाजसोबत शाहिदचा ‘रंगून’ हा दुसरा चित्रपट आहे. मात्र, कंगना राणौत हिने या चित्रपटातून दिग्दर्शकासोबत डेब्यू केला आहे. शाहिद, कंगना आणि सैफचा लुक या चित्रपटाचे विशेष म्हणता येईल. चित्रपटाविषयी बोलताना भारद्वाज म्हणाले,‘मी ‘रंगून’ च्या निमित्ताने या तिघांनाही एकत्र आणू शकलो, याचा मला आनंद आहे. मी प्रथमच कंगनासोबत काम करत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रीसोबत काम करणं माझ्यासाठीही सोप्पं नाही.’चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना अजूनही तारखांविषयी गोंधळ कायम आहे. पण, तरीही फेब्रुवारीमध्ये चित्रपट रिलीज झाल्यास सर्वच कलाकारांसाठी ते जास्त सोयीस्कर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. २५ फेब्रुवारीला शाहिदच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट रिलीज करण्यात येणार असल्याचे कळतेय. कंगनाचा ‘तन्नू वेड्स मन्नू’ देखील फेबु्रवारीतच रिलीज झाला असल्याने तिला या महिन्याबद्दल विशेष आस्था आहे. सैफ आणि विशाल हे ‘ओमकारा’ नंतर जवळपास १० वर्षांनी ‘रंगून’ साठी एकत्र आले आहेत.