Join us

सलमान खानच्या 'राधे'च्या सेटवर अपघात, थोडक्यात बचावला हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 12:28 IST

एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना हा अपघात झाला आणि रणदीप हुड्डाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागले.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान लवकरच 'दबंग ३'  सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२०मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा सिनेमा 'राधे'च्या शूटिंगला सलमानने सुरुवात देखील केली आहे. मात्र बिग बॉस 13 चे शूट आणि राधे सिनेमाच्या शूटिंग डेट्स क्लॉश होतायेत. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार राधेच्या सेटवर एक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात राधेमध्ये नेगेटिव्ह भूमिका साकारणारा रणदीप हुड्डाला दुखापत झाली आहे. 

रिपोर्टनुसार राधे हा एक जबरदस्त अ‍ॅक्शन सिनेमा आहे. एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना हा अपघात झाला. यात रणदीपला दुखातप झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं होते. मात्र ताज्या माहितीनुसार रणदीपला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. लवकरच तो बरा होऊन पुन्हा सेटवर परतणार असल्याची देखील माहिती आहे.  

राधेमध्ये सलमान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान आणि प्रभूदेवा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.तर भारत सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसलेली दिशा पटानी या चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.

टॅग्स :रणदीप हुडासलमान खान