Join us

रणदीप हुडाने वाचवले ‘त्या’ घोड्याचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 19:35 IST

रणदीप हुडा न केवळ चांगला अभिनेता आहे तर तो एक संवेदनशील व्यक्तीदेखील असून ज्याला प्राणीमात्रांची खूप काळजी आहे.त्याचे ...

रणदीप हुडा न केवळ चांगला अभिनेता आहे तर तो एक संवेदनशील व्यक्तीदेखील असून ज्याला प्राणीमात्रांची खूप काळजी आहे.त्याचे घोड्यांवर असणारे प्रेम तर जगजाहीर आहे. म्हणूनच की काय, त्याने व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून एका घोड्याचे प्राण वाचवले.त्याचे झाले असे की, माथेरान येथे घोड्यांना दिली जाणाऱ्या अमानुष वागणूकीचा व्हिडिओ मागच्या आठवड्यात त्याच्या पाहण्यात आला. घोड्यावर होणारा हा आतोनात छळ पाहून तो तर हादरलाच.पण अशा वेळी सोशल मीडियावर केवळ हळहळ व्यक्त करण्याऐजवी तो थेट पोहचला माथेरानमध्ये.तो सांगतो, माझे मित्र आदिल गांधी आणि त्यांचा मुलगा रियाद यांना सोबत घेऊन मी जखमी घोड्यांसाठी काही औषध घेऊन तेथे गेलो. माथेरानमधील टॉय ट्रेन बंद पडल्यामुळे सामानाची ने-आण घोड्यांवर केली जाते. काही लहान घोड्यांवर तर एकाच वेळी तीन-तीन गॅस सिलंडरचे ओझे वाहिले जाते. हा तर त्यांच्यावर होणारा अत्याचरच आहे.माथेरानमधील संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन रणदीपने तेथील लोकांना घोड्यांवर अतिजास्त भार न लादण्याचे आव्हान केले. तो म्हणतो, मला माहितीए की येथील लोकांचा रोजगार घोड्यांवर अवलंबून आहे. ते काही जाणूनबुजून घोड्यांना त्रास देत नाही. फक्त त्यांना याबाबत जागृत करण्याची गरज आहे.आता रणदीपचे असे ‘अ‍ॅनिमल लव्हर’ रुप पाहून त्याचे चाहते एकदम खुश झाले आहेत.