Join us

रणबीरचा बर्थडे नव्या घरात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 09:59 IST

 गेल्या काही महिन्यांपासून कपूर फॅमिलीतील लाडका रणबीर कपूर हा त्याची आजी कृष्णा राज क पूर हिच्यासोबत चेंबूर येथे राहत ...

 गेल्या काही महिन्यांपासून कपूर फॅमिलीतील लाडका रणबीर कपूर हा त्याची आजी कृष्णा राज क पूर हिच्यासोबत चेंबूर येथे राहत आहे. पण, आता तो लवकरच त्याच्या नव्या घरात म्हणजेच पाली हिल येथील अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे. यावर्षी त्याला वाटतेय की,‘त्याच्या बर्थडे बॅशला उशीर व्हायला नको.२८ सप्टेंबरला तो ३४ वर्षांचा होणार आहे. पण, तो त्याच्या मित्रांसोबत डबल सेलिब्रेशनची तयारी करतो आहे. कारण तो आॅक्टोबर महिन्यात नव्या घरात राहायला जाणार आहे. त्याला एक छोटीशी पार्टी त्याच्या नव्या फ्लॅटमध्ये द्यायची आहे.त्याचसोबत तो त्याची बर्थडे पार्टी देखील सेलिब्रेट करणार आहे. कॅटरिना कैफसोबत त्याची झालेल्या ताटातूटीनंतर आरके चे हे तिसरे घर आहे. वेल, नव्या घरात तरी कॅट येईल की नाही शंकाच आहे!