रणबीर-श्रुती अॅड शूटसाठी एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:36 IST
सध्या बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत कधीही एकत्र न दिसलेल्या जोड्या एकत्र दिसू लागल्या आहेत. यात आता एका नव्या जोडीची भर पडली ...
रणबीर-श्रुती अॅड शूटसाठी एकत्र?
सध्या बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत कधीही एकत्र न दिसलेल्या जोड्या एकत्र दिसू लागल्या आहेत. यात आता एका नव्या जोडीची भर पडली आहे. ‘सावरियाँ’ फेम रणबीर कपूर आणि ‘लक ’ फेम श्रुती हसन हे एका जाहीरातीच्या शूटींगसाठी एकत्र आले होते.या फोटोतून त्यांची जोडी किती योग्य दिसतेय हे कळते आहे. असे काही नाहीये की, कपूर फॅमिलीतील कोणी प्रथमच हसन सोबत काम करतेय. तर याअगोदर कमल हसन आणि ऋषी कपूर यांनी ‘सागर’ चित्रपटात एकत्र काम केले आहे.रणबीर सध्या ऐश्वर्या रॉय बच्चन सोबत ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये एकत्र काम करत आहे. तसेच ‘जग्गा जासूस’ चित्रपटातही कॅटरिनासोबत रणबीर दिसणार आहे.