Join us

रणबीर-कतरिना करणार जग्गा जासूसचे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 17:32 IST

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर जग्गा जासूस या चित्रपटाचे काय होणार असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण ...

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर जग्गा जासूस या चित्रपटाचे काय होणार असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण त्या दोघांनी आपले वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून या चित्रपटाच्या चित्राकरणाला सुरुवात केली. या चित्रपटाचे चित्रीकरण आता अंतिम टप्प्यात सुरू असून चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरवली जाणार आहे. त्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली जाणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन रणबीर आणि कतरिना दोघे एकत्र करणार आहेत. रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपचा कोणताही परिणाम जग्गा जासूस या चित्रपटावर होऊ नये यासाठी ते दोघेही प्रयत्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघेही अतिशय प्रोफेशनल असल्याने त्यांनी एकत्र प्रमोशन करण्यास होकार दिला असल्याचे या चित्रपटाचे निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी म्हटले आहे.