माहिरा खानसाठी नाही तर ‘या’ कारणासाठी लंडनमध्ये गेला होता रणबीर कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 13:26 IST
रणबीर कपूर आपल्या मैत्रिणीला भेटायला लंडनला गेला होता, ही बातमी तुम्ही वाचलीच. आता ही मैत्रिण कोण तर पाकिस्तानी अभिनेत्री ...
माहिरा खानसाठी नाही तर ‘या’ कारणासाठी लंडनमध्ये गेला होता रणबीर कपूर!
रणबीर कपूर आपल्या मैत्रिणीला भेटायला लंडनला गेला होता, ही बातमी तुम्ही वाचलीच. आता ही मैत्रिण कोण तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान. होय, माहिराला भेटण्यासाठीचं रणबीर लंडनला गेल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. (आता माहिरा व रणबीरचे काय नाते, असा प्रश्न तुम्हाला पडायला नकोय. कारण माहिरा व रणबीरचे स्मोकिंग करतानाचे फोटो अद्यापही चर्चेत आहेत.) ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग संपते ना संपते तोच रणबीरने थेट लंडन गाठले. कारण, माहिराही म्हणे लंडनमध्ये होती. पण लंडनमधील रणबीर व माहिराच्या भेटीची ही बातमी निव्वळ अफवा होती. होय, कारण रणबीर लंडनमध्ये का गेला होता, यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. रणबीर लंडनमध्ये गेला होता, हे खरे आहे. पण माहिराला भेटायला नाही तर वेगळ्याच कारणासाठी. डिएनएने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटासाठी रणबीर मार्शल आर्ट शिकतो आहे. याच्याच स्पेशल ट्रेनिंगसाठी रणबीर लंडनमध्ये गेला होता. या चित्रपटात रणबीर अनेक प्रकारचे अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. विशेषत: कलरीपयट्टू आणि वर्मा कलाई हे दोन मार्शल आर्टचे दोन फॉर्म्स रणबीर यात करणार आहे. याच्याच ट्रेनिंगसाठी रणबीर लंडनमध्ये होता.ALSO READ : OMG ! पुन्हा एकदा स्मोकिंग करताना दिसली माहिरा खान!!‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट विज्ञानवर आधारित आहे. ज्यात रणबीर एका सुपरहिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग १५ आॅगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. लवकरच रणबीर कपूर संजय दत्तच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. ‘संजू’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजूबाबाची भूमिका साकारणार आहे. त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.