रणबीर कपूरने आलिया भट्टला फटकारले; आलियाने म्हटले, ‘मला रणबीरसोबत लग्न करायचे’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 16:40 IST
आलिया भट्टने मला ‘रणबीर कपूरसोबत लग्न करायचे’ असे म्हटल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रणबीर कपूरने आलिया भट्टला फटकारले; आलियाने म्हटले, ‘मला रणबीरसोबत लग्न करायचे’!
सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये चांगल्याच रंगताना बघावयास मिळत आहेत. सध्या हे दोघे ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बिग बजेट असलेल्या करण जोहरच्या या चित्रपटाची शूटिंग सध्या इस्त्रायल येथे सुरू आहे. आलिया आणि रणबीर यांनी एकत्र न्यू इअर सेलिब्रेशन केले होते. जेव्हा या दोघांचे फोटो समोर आले तेव्हा असे वाटत होते की, हे दोघे एकमेकांना डेट करीत आहेत. कॅटरिनाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर सिंगल लाइफ जगत आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रासोबत आलियाचे ब्रेकअप झाल्याचे आता जवळपास कन्फर्म झाले आहे. त्याचबरोबर अशाही बातम्या समोर येत आहेत की, चित्रपट हिट करण्यासाठी करण जोहरची ही मार्केटिंग स्ट्रॅटीजी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर या अफवांमुळे चांगलाच त्रस्त आहे. कारण रणबीर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबत लॉन्ग डिसटेन्स रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आलियासोबत नाव जोडले जाणे त्याला अजिबातच पसंत नसल्याचे समजते. याविषयी त्याने आलिया आणि करण जोहरच्या टीमला फटकारल्याचीही बातमी समोर येत आहे. असो, रणबीर सध्या या चर्चांमध्ये न गुरफटता आपल्या कामावर लक्ष देणे पसंत करीत आहे. मात्र याचदरम्यान एक व्हिडीओ समोर आल्याने पुन्हा एकदा आलिया-रणबीरच्या अफेअरची चर्चा समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये आलिया म्हणतेय की, ‘मी अगोदरपासूनच रणबीर कपूरसोबत लग्न करू इच्छिते.’ हा व्हिडीओ ‘कॉफी विद करण’ या शोच्या एका एपिसोडचा आहे. ज्यामध्ये आलिया आणि परिणिती चोपडा एकत्र सहभागी झाल्या होत्या. या एपिसोडमध्ये आलियाने म्हटले की, जेव्हा मी रणबीरसोबत काही वेळ व्यतीत केला तेव्हा मला कळून चुकले की, तो एक चांगला व्यक्ती आहे. आलिया पुढे म्हणताना दिसत आहे की, ‘मला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे अन् मला हे मान्य करण्यास काहीच लाज वाटत नाही. याविषयी रणबीर कपूरची आई नीतू कपूरदेखील जाणून आहे.’ असो, दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याची जर अफवा नसली तरी या दोघांना एकत्र बघणे त्यांच्या चाहत्यांनाही आवडेल.