Join us

रणबीर कपूरचा 'राजनीति' लूक, तर कोणी म्हणालं 'जग्गा जासूस'; 'बर्फी'वर पुन्हा चाहते फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 14:25 IST

रणबीर कपूर दिवसेंदिवस जास्तच हँडसम दिसत आहे.

हिंदी सिनेसृष्टीत आता अनेक अभिनेत्यांनी आपली 'चॉकलेट बॉय' हिरोची इमेज खोडून काढत अँग्री लूकमध्येच दिसत आहेत. शाहीदर कपूरचा 'कबीर सिंह' असो किंवा सध्या चर्चेत असलेला रणबीर कपूरचा Animal असो. दोन्ही सिनेमातील हिरो कधीकाळी हिंदी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय होते. आता त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. रणबीर कपूर Animal नंतर त्याचा सीक्वेल Animal पार्कमध्येही दिसणार आहे. दरम्यान त्याआधी तो नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे. रणबीर कपूरच्या फॅशनचं नेहमी कौतुक होतं. तो कधीच अतरंगी कपड्यात दिसत नाही. आताही त्याचा विमानतळावरील लूक व्हायरल होतोय.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी ग्रे शर्ट, ब्लू जॅकेट आणि फिक्या रंगाची पँट घातली होती. तसंच त्याने क्लीन शेव्हही केलं आहे. गॉगलऐवजी त्याने चष्मा घातलेला दिसतोय. रणबीरचा हा लूक पाहून चाहते तर पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडलेत. कोणाला 'राजनीति'सिनेमातील त्याच्या लूकची आठवण झाली तर कोणी त्याला 'हॅरी पॉटर' असंही म्हणताना दिसत आहे. तसंच त्याचा 'जग्गा जासूस' सिनेमातील लूकही असाच होता. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्या लूकवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट केल्या आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Animal च्या तुफान यशानंतर रणबीर कपूरकडे सिनेमांची रांगच लागली आहे. Animal चा सीक्वेल Animal Park मध्ये तर तो आहेच. शिवाय 'ब्रह्मस्त्र 2' चंही शूटिंग सुरु होणार आहे. शिवाय नितेश तिवारींचा 'रामायण' आधी येण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर संजय लीला भन्साळी यांनी रणबीर-आलिया-विकी यांना घेऊन 'लव्ह & वॉर' सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे यापुढच्या काळातही थिएटरमध्ये रणबीरची जादू पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरफॅशनबॉलिवूड