Join us  

Shamshera Box Office Collection Day 6: 150 कोटींचा ‘शमशेरा’ पण रिकामं थिएटर; 6 दिवसात डब्बा गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 3:25 PM

Shamshera Box Office Collection Day 6: ‘शमशेरा’ कडून सगळ्यांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फुसका बार निघाला.

रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) 4 वर्षानंतर ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर वापसी केली होती. पण दुदैवाने त्याचं कमबॅक फसलं. होय, ‘शमशेरा’ कडून सगळ्यांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फुसका बार निघाला. आठवडाभरातच या चित्रपटाने भम्रनिरास केल्याचं चित्र आहे.

रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त 10.25 कोटींचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशी 10.50 कोटींचं कलेक्शन केलं. तिसऱ्या दिवशी 11 कोटींची कमाई केली. यानंतर मात्र ‘शमशेरा’चा ग्राफ घसरला. चौथ्या दिवशी 2.80, पाचव्या दिवशी 2.50 कोटी आणि   सहाव्या दिवशी या चित्रपटाने 2.30 कोटींची कमाई केली. आत्तापर्यंतची चित्रपटाची एकूण कमाई 39.75 कोटी आहे. हे आकडे निराश  करणारे आहेत. पहिल्या आठवड्यात हा चित्रपट 40 कोटींचा टप्पा गाठेल अशी आशा आहे. ‘शमशेरा’वर 150 कोटी रूपयांचा खर्च झाला होता. मात्र जाणकारांच्या मते, हे 150 कोटी वसूल करणंही कठीण दिसतंय. अगदी 100 कोटींचा आकडा गाठणंही मुश्किल वाटतंय.

दिग्दर्शकाने मागितली माफी

‘शमशेरा’चं दिग्दर्शन करण मल्होत्राने केलं आहे. सात वषानंतरचा हा त्याचा पहिला सिनेमा होता. पण रणबीरसोबत करण मल्होत्राचं कमबॅकही फ्लॉप ठरलं. अशात करण मल्होत्राने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.  ‘माझ्या प्रिय शमशेरा, तू होतास तसा भारी आहेस. माझ्यासाठी या सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त होणं महत्त्वाचं  कारण इथेच तुमच्याबद्दल प्रेम, द्वेष, आनंद आणि अपमान अशा गोष्टी पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून मी तुझ्याबद्दल होत असलेली चुकीची आणि द्वेषपूर्ण चर्चा थांबवू शकलो नाही म्हणून मी तुझी माफी मागतो. माझं न बोलणं ही माझा कमकुवतपणा आहे आणि त्यासाठी कोणतंही कारण नाही. पण आता मी तुझ्यासोबत आहे, अभिमानाने तुझा हात धरून आहे की तू माझा आहेस.आपण सगळे मिळून चांगले, वाईट आणि त्यापेक्षाही वाईट सहन करू. शमशेराच्या संपूर्ण टीमला माझे प्रेम. आम्हाला मिळालेले प्रेम, आशीर्वाद  खूप मौल्यवान आहेत आणि ते कोणीही आमच्यापासून दूर करू शकत नाही,’असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. शिवाय शमशेरा माझा आहे, असा हॅशटॅगही शेअर केला आहे. 

टॅग्स :शमशेरारणबीर कपूर