अनोळखी मुलीसोबत रोमान्स करताना दिसला रणबीर कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 10:04 IST
रणबीरचे काही फोटो इंटरनेशवर व्हायरल झाले आहेत. यात रणबीर एका अनोळखी मुलीसोबत रोमान्स करताना दिसतो आहे. या फोटोंमधील रोमान्स पाहून कोट्यवधी तरूणींच्या आशेवर पाणी फेरले जाईल.
अनोळखी मुलीसोबत रोमान्स करताना दिसला रणबीर कपूर!
रणबीर कपूरवर जीव ओवाळून टाकणाºया तरूणींची कमी नाही. पण रणबीरच्या देशभरातील या फिमेल फॅन्सला एकावर एक धक्के बसताहेत. आधी रणबीरसाठी वधू संशोधन सुरु असल्याची बातमी आली. रणबीरची आई नीतू कपूर यांनी रणबीरसाठी लंडनची मुलगी पसंत केली,असे कळले. या बातमीने कित्येक तरूणींचे हृदय तोडले असेल, याची मोजदाद नाही आणि अशात आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. होय, रणबीरचे काही फोटो इंटरनेशवर व्हायरल झाले आहेत. यात रणबीर एका अनोळखी मुलीसोबत रोमान्स करताना दिसतो आहे. या फोटोंमधील रोमान्स पाहून कोट्यवधी तरूणींच्या आशेवर पाणी फेरले जाईल. अर्थात तुम्ही यापेक्षा अधिक चुकीचे समजू नये, यासाठी या फोटोंमागील खरे रहस्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रणबीरच्या फिमेल फॅन्सनी हे फोटो फार मनाला लावून घेण्याची गरज नाही. होय, कारण ते रणबीरच्या कामाचा भाग आहेत. म्हणजे, एका कमर्शिअल शूटचे हे फोटो आहेत. रणबीर ज्या मुलीसोबत रोमान्स करताना दिसतोय, ती एक मॉडेल आहे. एका जाहिरातीच्या शूटदरम्यानचे हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये रणबीर खूप तगडा दिसतोय. याचे कारण म्हणजे, संजय दत्तचे बायोपिक़ या बायोपिकसाठी रणबीरने आपले वजन वाढवले आहे. लवकरच रणबीर ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफ त्याच्याशी आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर दिसणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगितले आहेच. यानंतर अयान मुखर्जी याच्या ‘ड्रगन’ या चित्रपटात रणबीर दिसणार आहे. यात त्याच्या अपोझिट आलिया भट्टची वर्णी लागली आहे.