या चित्रपटानंतर मात्र दोघांच्या मैत्रीची चर्चा रंगू लागली. मात्र आपल्या मैत्रीला रणबीर टिकला नाही असे आरोप त्याच्यावर होऊ लागले. दीपिकाने तर रणबीरच्या नावाचा टॅटूदेखील बनविला होता. त्यावेळी दोघेही बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसू लागले होते. याशिवाय तर दोघांची एंगेजमेंटच्या गोष्टीही होऊ लागल्या होत्या.
असे म्हटले जाते की, जो पर्यंत दीपिका त्याच्या सोबत होती किंवा त्यांचे ब्रेकअप झाल्याचे पूर्णपर्ण बाहेर आले नव्हते तो पर्यंत त्याचे करिअर चढत्या क्रमाने शिखर गाठत होते. दोघांनी राजनीति आणि रॉकस्टार सारखे चित्रपट केले आणि ब्रेकअप नंतरचा त्यांचा ‘ये जवानी है दीवानी’(२०१३) हा चित्रपट तर सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.
मात्र दोघांच्या या प्रेम कथेचा महत्त्वाचा भाग ब्रेकअप नसून रणबीरचा विश्वासघात आहे. कारण ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाच्या वेळेसच रणबीर कॅटरिना कैफकडे आकर्षित झाला होता. मात्र ही गोष्टीचा जास्त खुलासा झाला नव्हता.
दीपिकाला असे वाटत होते की, सर्वकाही अगदी सुरळीत सुरू आहे. मात्र ती या गोष्टीपासून अनभिज्ञ होती. रणबीर कॅटरिनाकडे वळला आणि दोघांनी जोेही चित्रपट केला त्याचा मात्र खूप वाईट परिणाम झाला. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे ‘जग्गा जासूस’ होय. त्यानंतर मात्र दीपिकाने रणबीरसोबत २०१५ मध्ये ‘तमाशा’ काम केले आणि रणबीरचा हा चित्रपट हिट ठरला. त्यानंतर मात्र रणबीर हिट चित्रपटासाठी वाटच पाहत आहे. यावरुन असे वाटते की, दीपिका त्याच्यासाठी लकी चार्म होती.