रणबीर कपूरपुढे का हात जोडतेयं माहिरा खान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 12:29 IST
रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान अलीकडे दुबईत एका इव्हेंटमध्ये सामील झाले होते. या इव्हेंटमध्ये दोघेही अतिशय आनंदात कॅमेºयापुढे एकत्र पोझ देताना दिसले होते. पण यानंतर अचानक काय झाले, ठाऊक नाही. पण माहिरा खान चक्क रणबीरपुढे हात जोडताना दिसली.
रणबीर कपूरपुढे का हात जोडतेयं माहिरा खान?
रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान अलीकडे दुबईत एका इव्हेंटमध्ये सामील झाले होते. या इव्हेंटमध्ये दोघेही अतिशय आनंदात कॅमेºयापुढे एकत्र पोझ देताना दिसले होते. पण यानंतर अचानक काय झाले, ठाऊक नाही. पण माहिरा खान चक्क रणबीरपुढे हात जोडताना दिसली. या दोघांचा एक बॅकस्टेज व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत माहिरा खान रणबीरला कसली तरी विनवणी करताना दिसते आहे. हात जोडून ती रणबीरला काहीतरी म्हणते आहे. हा व्हिडिओ पाहता, माहिरा अतिशय चिंतेत आहे, असे वाटते. याऊलट रणबीर मात्र एकदम कूल दिसतोय. माहिरा जे काही बोलते आहे, त्याचा रणबीरवर कुठलाच परिणाम होताना दिसत नसल्याचे हा व्हिडिओ सांगतोय. सध्या सगळीकडे हा एकच व्हिडिओ फिरतो आहे. व्हिडिओला आवाज नसल्याने, रणबीर व माहिरामध्ये नेमके कशाबद्दल बोलताहेत आणि माहिरा इतकी चिंतेत का आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे या व्हिडिओमागचे सत्य काय, हे तर रणबीर आणि माहिरा या दोघांनाच माहित. also read : Raees रिलिज झाल्यानंतर महिरा खान झाली नाराज?माहिरा खान अलीकडे शाहरूख खान स्टारर ‘रईस’मध्ये दिसली होती. पण बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याच्या मागणीने डोके वर काढल्याने माहिराला भारतात या चित्रपटाचे प्रमोशन करता आले नव्हते. याऊलट रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ त्याची हिरोईन आहे. याशिवाय संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर सध्या बिझी आहे. या चित्रपटासाठी रणबीरने त्याचे वजनही वाढवले आहे. माहिरासोबतच्या व्हिडिओतही रणबीरचे वाढलेले वजन स्पष्टपणे दिसतेय.