Join us

​संजय दत्तच्या बायोपिकसाठी अशी रूपं बदलणार रणबीर कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 12:57 IST

रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये बिझी आहे. या चित्रपटासाठी रणबीर सध्या बरीच मदत घेतो आहे. अलीकडे या चित्रपटाच्या ...

रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये बिझी आहे. या चित्रपटासाठी रणबीर सध्या बरीच मदत घेतो आहे. अलीकडे या चित्रपटाच्या सेटवरचे रणबीरचे काही फोटो लिक झाले होते. या फोटोंमध्ये रणबीर कपूर अगदी हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतोय. या चित्रपटात रणबीर कपूर वेगवेगळ्या गेटअपमध्ये दिसणार आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहे. कारण, या बायोपिकमध्ये संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे दिसणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर संजयचे लूक बदलले आहे. अगदी त्याचप्रमाणे चित्रपटातील रणबीरचे लूकही बदलणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात रणबीर कपूर एक नाही, दोन नाही तर एकूण सहा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसेल.ALSO READ : रणबीर कपूरच्या टोपीखाली दडलयं काय?अलीकडे रणबीर लांब केस आणि दाढी अशा लूकमध्ये दिसला होता. (९० च्या दशकात संजय दत्तचे केस लांब होते. त्याचे ते लूक त्यावेळी भलतेच लोकप्रीय झाले होते. संजय दत्तच्या त्याच लूकमध्ये रणबीर चित्रपटात दिसणार आहे. ) याशिवाय रणबीरने या चित्रपटासाठी वजनही वाढवले आहे. यानंतर दोन महिन्याच्या ब्रेकनंतर रणबीर त्याचे वजन कमी करणार आहे.  संजयचा ‘रॉकी’हा बॉलिवूड डेब्यू सिनेमा आठवतो? या चित्रपटात संजय दत्त कसा होता. नेमक्या याच रूपात रणबीरला दिसायचे आहे. यासाठी रणबीरला बरेच वजन कमी करावे लागणार आहे. ‘रॉकी’ ते ‘खलनायक’ आणि ‘खलनायक’ ते ‘मुन्नाभाई’ अशा सगळ्या चित्रपटात संजय दत्त वेगवेगळ्या रूपात दिसला. यानंतर तुरुंगात शिक्षा भोगताना तो आणखी वेगळ्याच रूपात लोकांसमोर आला. हे सगळे टप्पे रणबीर आपल्या अभिनयातून साकारणार आहे. अगदी हुबेहुब संजूबाबा स्टाईलने. आता यात रणबीरला किती यश येते, ते बघूयात!